शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कृषी विभागाने दडविले १५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:01 IST

कीटकनाशक फवारणीमुळे आणि कीटकनाशक प्राशनामुळे नागपूर शहर-जिल्ह्यात १५ शेतकºयांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी काढली अधिकाºयांची खरडपट्टी : शेतकºयांना मार्गदर्शन करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कीटकनाशक फवारणीमुळे आणि कीटकनाशक प्राशनामुळे नागपूर शहर-जिल्ह्यात १५ शेतकºयांचा मृत्यू झाला. परंतु या मृत्यूची माहिती कृषी अधिकाºयांनी दडवून ठेवली. लोकप्रतिनिधीला साधी माहिती देण्याचे सौजन्य अधिकाºयांनी दाखविले नाही. त्यामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रविभवन येथे तातडीची बैठक बोलावून अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढली.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात सोमवारी रविभवनात बैठक बोलावली होती. या बैठकीला आ. मल्लिकार्जुन रेड्डी आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे ५ आणि कीटकनाशक प्राशनाने १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कृषी अधीक्षकांनी या बैठकीत दिली. १८ जुलैला पहिला मृत्यू झाला असताना आजतागायत या मृत्यूची माहिती कृषी, महसूल आणि पोलीस विभागाला, पालकमंत्र्यांना द्यावीशी वाटली नाही. पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली म्हणून त्यांना या अक्षम्य प्रकाराची माहिती मिळाली.महसूल, कृषी आणि पोलीस या तीनही विभागांचा एकमेकात समन्वय नसल्याचे दिसले. या घटना टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकºयांना आणि शेतमजुरांना मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. कृषी विभाग म्हणतो १५ जणांचा मृत्यू झाला तर पोलीस म्हणतात ९ जणांची नोंद आमच्याकडे आहे.एकूणच तीनही विभागांमध्ये कोणताच समन्वय नसल्याचे सिद्ध झाले. कृषी अधीक्षकासोबत महसूल विभागाचा एकही उपविभागीय अधिकारी मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वना करण्यास गेला नसल्याचेही आढळले. प्रशासनच या घटनांपासून अंधारात राहाते. कृषी विभागाच्या अत्यंत ढिम्म, ढिसाळ, उदासीन आणि संवेदनाशून्य कारभाराचा हा नमुना आजच्या बैठकीत पाहायला मिळाला. लोकप्रतिनिधींना माहिती न दिल्यामुळे ते मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यास जाऊ शकले नाहीत आणि शासनाबद्दल गैरसमज पसरण्यास मदत झाली.पिकांवर फवारणी करताना विषबाधेने मृत झालेल्यांमध्ये कळमेश्वर येथील माणिक शेंडे, भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथील प्रभाकर मिसाळ, कामठी तालुक्यातील उनगाव येथील मुरलीधर खडसे, मौदा तालुक्यातील पावडदौना येथील संभाजी वांगे, खात येथील दिनेश ढोलवार यांचा समावेश आहे.कृषी अधिकारीच अनभिज्ञकीटकनाशकाच्या फवारणीमुळे मृत झालेल्या व्यक्तींबद्दल कृषी अधिकारी आणि कृषी सहायकांनाही माहिती नसल्याची बाब या बैठकीत निदर्शनास आली. एकही कृषी सहायक आणि कृषी अधिकारी मुख्यालयी राहात नसल्यामुळे आणि शेतकºयांच्या संपर्कात राहात नसल्यामुळे त्यांना ही माहिती मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले.मुख्यालयी राहून मदत करायावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी कृषी अधिकाºयांना मृत शेतकºयांच्या घरी भेटी देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करा, मुख्यालयी राहून शेतकºयांना योग्य ती मदत तात्काळ करा, असे निर्देश दिले.