शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अग्रवाल, पोकुलवार, वानखेडे व गांधी महापालिकेत

By admin | Updated: May 17, 2017 01:55 IST

महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता, भाजपाच्या कोट्यातून चार जणांना स्वीकृत सदस्याची संधी मिळणार आहे.

भाजपाचे चार स्वीकृत सदस्य जाहीर : आयुक्त करणार शिक्कामोर्तब लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता, भाजपाच्या कोट्यातून चार जणांना स्वीकृत सदस्याची संधी मिळणार आहे. या चार नावांवर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. यात माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, यांच्यासह किशोर वानखेडे व निशांत गांधी यांचा समावेश आहे. मध्य, पूर्व, उत्तर व दक्षिण नागपुरातील एकालाही स्वीकृत सदस्याची संधी मिळालेली नाही. महापालिका निवडणुकीत मुन्ना पोकुलवार यांना भाजपाने उमेदवारी दिली नव्हती. सुनील अग्रवाल यांचा प्रभाग नवीन प्रभाग रचनेत चार भागात विभागला गेला होता. त्यामुळे अग्रवाल यांना निवडणुकीत संधी मिळाली नव्हती. किशोर वानखेडे व निशांत गांधी भाजपात सक्रिय असल्याने त्यांना महापालिकेत संधी देण्यात आली आहे. स्वीकृत सदस्यत्व मिळण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्यांना मात्र संधी नाकारण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी दिली. १९ मे रोजी स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी दिली. काँग्रेसचे नाव निश्चित नाही संख्याबळाचा विचार करता काँग्रेसच्या कोट्यातून एकाला स्वीकृत सदस्याची संधी मिळणार आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे अद्याप नाव निश्चित करण्यात आलेले नाही. आयुक्त स्वीकारणार अर्ज स्वीकृत सदस्यासाठी १८ मे रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १९ मे रोजी अर्जाची छाननी करून आयुक्त पात्र उमेदवारांची नावे जाहीर करतील. त्यानंतर सभागृहात महापौर स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा करतील. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आयुक्तांनी गटनेत्यांची बैठक घेतली होती.