शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

जिल्ह्यात अग्नितांडव

By admin | Updated: April 18, 2017 02:13 IST

चैत्राचे रखरखते ऊन आणि ४४ डिग्री सेल्सिअस तापमान, यामुळे ग्रामीण भागात दुपारच्या वेळी संचारबंदीसदृश वातावरण अनुभवायला मिळत आहे.

ब्राह्मणीत घर तर खरड्यात गोठा खाक : भगवानपूर शिवारात शेतीपयोगी साहित्य जळालेनागपूर : चैत्राचे रखरखते ऊन आणि ४४ डिग्री सेल्सिअस तापमान, यामुळे ग्रामीण भागात दुपारच्या वेळी संचारबंदीसदृश वातावरण अनुभवायला मिळत आहे. दुसरीकडे आगीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडत आहे. जिल्ह्यात सोमवारी आगीच्या दोन आणि रविवारी एक अशा तीन घटना घडल्या. सोमवारी दुपारी मौदा तालुक्यातील खरडा शिवारात असलेला गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला तर कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथील घर जळाले. शिवाय, रविवारी सायंकाळी भिवापूर तालुक्यातील भगवानपूर शिवारातील शेतीपयोगी साहित्य व जनावरांचा चारा आगीत राख झाला. मौदा तालुक्यातील कोदामेंढी-रेवराळ मार्गावरील खरडा गावालगतच्या शेतात असलेल्या तणसाच्या गंजीला सोमवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. अल्पावधीतच आगीने रुद्र रूप धारण केले आणि ही आग पसरत जवळच असलेल्या गोठ्याला लागली. आगीच्या दाहकतेमुळे गोठ्यातील जनावरे पळण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांचे दोरखंड वेळीच कापण्यात आल्याने ती जनावरे थोडक्यात बचावली. माहिती मिळताच खरडा व रेवराळ येथील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी मिळेल त्या साधनाने गोठा व तणसाच्या ढिगाला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. गोठ्याची आग नियंत्रणात येईपर्यंत गोठ्यात ठेवलेले १० पोती गहू, कुटार (जनावरांचे वैरण), शेतीपयोगी साहित्य व औजारे खाक झाली. आगीची माहिती मिळताच अरोली पोलिसांनी अग्निशमन दलाला सूचना दिली होती. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले नव्हते. तोपर्यंत नागरिकांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले होते. कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथील रहिवासी महादेव विठोबा पर्बत यांच्या घराला सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. त्यावेळी घरी कुणीही नसल्याने प्राणहानी झाली नाही. परंतु या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य खाक झाले. घरातून धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच शेजाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यातच कळमेश्वर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. भिवापूर तालुक्यातील भगवानपूर शिवारातील शेतातील कचऱ्याने पेट घेतला. ही आग हवेमुळे दुसऱ्या शेतापर्यंत पसरत गेली. त्यात शेतात साठवून ठेवलेला गुरांचा चारा आणि शेतीपयोगी साहित्याची राख झाली. (प्रतिनिधींकडून)तरुण जखमी, जनावरे बचावलीखरडा येथील शेतात असलेल्या तणसाच्या गंजीची आग पसरल्याने आगीने जवळच असलेल्या गोठ्याला कवेत घेतले. गोठ्यात त्यावेळी तीन गाई, एक म्हैस, एक कालवड व एक वगार अशी एकूण सहा जनावरे बांधली होती. ही जनावरे आगीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. परंतु, त्यांना बांधलेल्या दोरखंडामुळे ते पळून जाऊ शकत नव्हते. त्यातच गोठ्याला आग लागल्याचे लक्षात येताच प्रकाश रामकृष्ण कोल्ली, रा. खरडा हा तरुण जीवाची पर्वा न करताना लगेच गोठ्यात शिरला. त्याने सावधगिरी बाळगत गोठ्यातील सर्व जनावरांचे दोरखंड वेळीच कापले. यात गोठ्यातील सर्व जनावरे थोडक्यात बचावली. परंतु, प्रकाश कोल्ली यांच्या चेहऱ्याला जळाल्याने इजा झाली. चाऱ्याचे संकटमौदा व भिवापूर तालुक्यात तणसाचा वापर जनावरांचे वैरण म्हणून केला जातो. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेतांमध्ये तसेच गावालगतच्या शेतांमध्ये तणसाचे मोठमोठे ढीग लावले आहेत. या ढिगाजवळ तसेच शेतात सर्वत्र कचरा पडलेला असतो. या कचऱ्यावर कुणी जळती बिडी जरी टाकली तरी कचऱ्याला लागलेली आग अल्पावधीत दूरवर पसरते. त्यामुळे तणसाचे ढीग लावताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. खरडा येथील आगीत गोठ्याजवळ ठेवलेले तणसाचे दोन्ही ढीग पूर्णपणे जळाले. शिवाय, भगवानपूर शिवारातील आगीत राजू भुसारी यांच्यासह इतरांच्या शेतात ठेवलेले तणसाचे ढीग खाक झाले. त्यामुळे या शेतकऱ्यांवर जनावरांच्या चाऱ्याचे नवे संकट ओढवले आहे.