शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश शाहूविरुद्ध पुन्हा एक गुन्हा

By admin | Updated: October 16, 2015 03:26 IST

संपत्ती हडपण्यासाठी विधवा महिलेला भरवस्तीत बेदम मारहाण करणारा आणि पीडित महिलेच्या मदतीला धावणाऱ्या महिला - पुरुषांना ...

कथित आरटीआय कार्यकर्त्याची गुंडगिरी : सुनेचा विनयभंग, सासूला शिवीगाळ धमकी नागपूर : संपत्ती हडपण्यासाठी विधवा महिलेला भरवस्तीत बेदम मारहाण करणारा आणि पीडित महिलेच्या मदतीला धावणाऱ्या महिला - पुरुषांना रिव्हॉल्व्हर दाखवून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या मुकेश जयदेव शाहू याच्याविरुद्ध लुटमार आणि विनयभंगाचा पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी मुकेश शाहूने वर्गणी दिली नाही म्हणून किराणा दुकानाचा गल्ला लुटला तसेच आपल्या सुनेला धक्काबुक्की करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याची या महिलेची तक्रार आहे. त्यावरून कळमना पोलिसांनी आरोपी मुकेशविरुद्ध लुटमार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.पीडित महिलेचे (वय ५१) किराणा दुकान आहे. ११ आॅक्टोबर ला दुपारी ४ वाजता आरोपी मुकेश शाहू त्यांच्या दुकानात आला. त्याने महिलेला वर्गणी मागितली. महिलेने वर्गणी देण्यास नकार दिला असता आरोपीने शिवीगाळ केली. त्यांच्या दुकानात शिरून जबरदस्तीने त्यांच्या दुकानाच्या गल्ल्यातील २०४० रुपये काढले. ते पाहून महिलेची सून समोर आली असता आरोपी मुकेशने महिलेच्या सुनेशी लज्जास्पद वर्तन करून तिला धक्का मारला आणि सासू-सुनेला धमकी देत निघून गेला. मुकेशच्या दहशतीमुळे पीडित महिला गप्प राहिली. आता मात्र त्याने एका विधवेला केस धरून भरवस्तीत मारहाण केल्याचे आणि रिव्हॉल्व्हरच्या धाकावर धमकावल्याचे प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केल्यामुळे पीडित महिलेनेही आरोपी मुकेशविरुद्ध तक्रार नोंदवली. कळमना पोलिसांनी या प्रकरणी जबरी चोरी, लुटमार आणि धमकीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी) २२ पर्यंत पीसीआरदरम्यान, आरोपी मुकेशविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे त्याचे साथीदार संबंधितांना धमक्या देत फिरत असल्याची चर्चा आहे. दहशतीमुळे कुणी खुलून बोलायला तयार नाही. मात्र, पीडित महिला आणि त्यांचे परिवारासह या भागातील अनेक जण प्रचंड दहशतीत आहेत. तीन दिवसात दोन गुन्हे दाखल झाल्यामुळे मुकेशची गुंडगिरी उघड झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक छाया गुजर यांनी गुरुवारी मुकेशला कोर्टात हजर करून त्याच्या पीसीआरची मागणी केली. गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्व्हर जप्त करायचे आहे आणि गुन्ह्यासंदर्भातील जाबजबाबाची चौकशी करायची आहे, असे त्यांनी सांगितले. मुकेशच्या वकिलांनी पीसीआरला विरोध केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने त्याला २२ पर्यंत पीसीआर मंजूर केला.