नागपूर : ईपीएफओच्या अन्यायाविरुद्ध बुधवार, ७ रोजी पेन्शनर्स देशव्यापी आंदोलन करणार असून ईपीएफओच्या अन्यायकारक २० मार्च २०२१ पत्राच्या प्रती जाळून विरोध करण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी एकीकडे ईपीएस९५ पेन्शनर्सच्या मागण्या मंजूर करण्यासाठी ४ मार्च २०२० ला प्रत्यक्षरीत्या आश्वासन दिले होते आणि योग्य समाधानासाठी संबंधित मंत्र्यांना निर्देशही दिले होते. श्रममंत्र्यांनी सर्व आंदोलन वापस घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार केवळ एनएसीचे मुख्यालय बुलडाणा येथे गेल्या ८३४ दिवसांपासून क्रमिक धरणे सोडून सर्व आंदोलने परत घेतली आहेत. पण दुसरीकडे कर्मचारी भविष्य निधी संघटनेतर्फे पेन्शनधारकांवर अन्याय व अत्याचार करण्यात येत आहे. अनेक मुद्यांचा विचार करून ईपीएफओच्या अन्यायकारक कृत्याचा देशव्यापी स्तरावर ईपीएफओच्या सर्व कार्यालयासमोर आंदोलन करून ईपीएफओच्या २० मार्च २०२१ च्या प्रती जाळण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधानांच्या नावाने पत्र ईपीएफओ कार्यालयात देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी दिली.
ईपीएफओच्या अन्यायाविरुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST