शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘जय’ च्या चौकशीला पुन्हा वेग

By admin | Updated: January 18, 2017 02:20 IST

उमरेड-कऱ्हांडला येथून अचानक गायब झालेल्या ‘जय’ या वाघाची अखेर उच्चस्तरीय (केंद्रीय) चौकशी सुरू झाली आहे.

एनटीसीए सक्रिय : स्वत: ‘आयजी’ नागपुरात दाखल होणार नागपूर : उमरेड-कऱ्हांडला येथून अचानक गायब झालेल्या ‘जय’ या वाघाची अखेर उच्चस्तरीय (केंद्रीय) चौकशी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या २० जानेवारी रोजी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) बंगळुरु येथील विभागीय कार्यालयाचे इन्स्पेक्टर जनरल आॅफ फॉरेस्ट (आयजी) पी. एस. सोमाशेखर नागपुरात दाखल होत असल्याची माहिती पुढे आली आहे. यानंतर ते २३ जानेवारीपर्यंत नागपुरात मुक्काम ठोकणार असून, दरम्यान उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यासह नागपूर सभोवतालच्या जंगलांचा दौरा करणार आहेत. यानंतर ते आपला अहवाल दिल्ली येथील एनटीसीए मुख्यालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सादर करतील. विशेष म्हणजे, मागील डिसेंबर महिन्यात एका चौकशी पथकाने नागपुरात पोहोचून काही लोकांचे बयान नोंदविले होते. मात्र त्याचवेळी नागपूर वन विभागाने ‘जय’ च्या प्रकरणावर वेळोवेळी वेगवेगळ्या पद्घतीने पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला आहे. कधी तो दुसरीकडे निघून गेल्याचे सांगण्यात आले, तर कधी तो एखाद्या अनोळखी व्यक्तीला दिसल्याची अफवा पसरविण्यात आली. मात्र वन विभागाच्या या बनवाबनवीच्या खेळात ‘जय’ चा अजूनपर्यंत कुठेही सुगावा लागलेला नाही. शिवाय नागपूर वन विभागाने त्यासाठी कधीच प्रामाणिक प्रयत्न सुद्धा केलेला नाही. कदाचित यामुळेच खासदार नाना पटोले यांनी थेट संसदेत ‘जय’ चा मुद्दा उपस्थित करू न, त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. त्यावर केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री अनिल दवे यांनी ‘जय’ च्या चौकशीसाठी विशेष पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) ही चौकशी सुरू केली असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी) वन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले या उच्चस्तरीय चौकशीने नागपूर वन विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ‘जय’ने पर्यटकांना भुरळ घातली होती. मात्र तेवढ्याच झपाट्याने तो उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून गायब झाला. त्यामुळे ‘जय’ सोबत काय झाले असावे, हा अद्याप अनुत्तीर्ण असलेला प्रश्न आहे.