शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अजय राऊतवर पुन्हा वार

By admin | Updated: July 21, 2016 01:57 IST

पोलिसात तक्रार दाखल केल्याने दुखावलेले गुन्हेगार आता पीडितांवर हल्ले करू लागले आहेत. मागील २४ तासात या प्रकारच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.

गुन्हे पीडितांवर हल्ले : पोलीस तक्रार केल्याने बार मॅनेजर जखमी नागपूर : पोलिसात तक्रार दाखल केल्याने दुखावलेले गुन्हेगार आता पीडितांवर हल्ले करू लागले आहेत. मागील २४ तासात या प्रकारच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिली घटना सीताबर्डी पोलीस ठाणे परिसरात घडली. यात बिल्डर आणि क्रिकेट बुकी अजय राऊत हा पीडित आहे. अजयचे सहा महिन्यांपूर्वी खंडणीसाठी प्रतापनगर परिसरातून अपहरण करण्यात आले होते. पावणेदोन कोटी रुपयांची खंडणी घेतल्यानंतर त्याला सोडण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगार राजू भद्रे, दिवाकर कोत्तुलवार, सुनील भाटियासह सहा आरोपींना अटक केली होती. तीन आरोपींचा अजूनही शोध सुरू आहे. मोकांतर्गत गुन्हा दाखल केल्याने अटक करण्यात आलेले आरोपी तुरुंगात आहेत. अजय राऊत मंगळवारी रात्री १ वाजता अ‍ॅक्टिव्हाने घरी जात होते. सीताबर्डी पोलीस ठाणे परिसरातील महाराजबाग चौकात पल्सरवर स्वार दोन तरुणांनी अ‍ॅक्टिीव्हा गाडीला लाथ मारून अजयला खाली पाडले होते. अजयला काही समजण्यापूर्वीच दोन्ही आरोपी त्याला ‘जास्त हुशारी करीत आहे, कोर्टबाजी करीत आहे’ असे म्हणत पळून गेले. अजयने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे मोका प्रकरणही पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी अजयच्या भावाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगाही आरोपी होता. मोका प्रकरणात पोलीस फरार आरोपींना अजूनही शोधू शकले नाही. शहर पोलिसांनी मोकांतर्गत रेकॉर्ड कारवाई केली, तरीसुद्धा या प्रकारच्या घटनांमुळे पीडितांमध्ये दहशत पसरली आहे. दुसऱ्या घटनेत गुन्हेगारांनी त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार करणाऱ्या बार मॅनेजरवर हल्ला केला. पोलीस घेणार का दखल ? नागपूर : हुडकेश्वर येथील गुन्हेगार पप्पू शाहू याने दोन महिन्यांपूर्वी भिलगाव येथील त्रिमूर्ती बार मॅनेजर विनोद तुरक यांना धमकावले होते. विनोदच्या तक्रारीनुसार हुडकेश्वर पोलिसांनी पप्पूविरुद्ध धमकावण्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पप्पूला पोलिसांनी अटक केली नव्हती. मंगळवारी रात्री १० वाजता पप्पू आपल्या पाच साथीदारांसह बारमध्ये पोहोचला आणि वाद घालू लागला. वेटर व कर्मचाऱ्यांना धमकावत बारमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करायला सांगितले. पप्पूच्या एका साथीदाराने विनोदच्या पायाला चावा घेतला. विनोदच्या डोक्यावर शीतपेयाची बॉटल मारून जखमी केले. पोलिसांनी पप्पूविरुद्ध हल्ला करणे व धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)