शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दोन वर्षांनंतर रेल्वे प्रवाशांना मिळणार शिजलेले अन्न; बेस किचन होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 07:20 IST

Nagpur News कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे नागपुरातील बेस किचन सुरू होत असून आगामी १५ दिवसांत रेल्वे प्रवाशांना बेस किचनमध्ये शिजविलेल्या दर्जेदार अन्नाची चव घेता येणार आहे.

ठळक मुद्दे ‘आयआरसीटीसी’ने दिले कंत्राट

दयानंद पाईकराव

नागपूर : कोरोनामुळे प्रवासी रेल्वेगाड्यात मिळणारे अन्न खाण्यास धजावत नव्हते. त्यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशनतर्फे चालविण्यात येणारे बेस किचन बंद होते; परंतु आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे नागपुरातील बेस किचन सुरू होत असून आगामी १५ दिवसांत रेल्वे प्रवाशांना बेस किचनमध्ये शिजविलेल्या दर्जेदार अन्नाची चव घेता येणार आहे.

कोरोनामुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या; परंतु या विशेष रेल्वेगाड्यातून प्रवास करणारे प्रवासी सुरक्षेच्या कारणास्तव बेस किचनमध्ये तयार झालेले अन्न घेण्याचे टाळून प्रवासाला निघताना घरूनच आपला टिफीन सोबत घ्यायचे. या कारणास्तव गेल्या दोन वर्षांपासून नागपूर रेल्वेस्थानकावरील बेस किचन बंद होते; परंतु आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ‘आयआरसीटीसी’ने नागपूर रेल्वेस्थानकावरील बेस किचन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार निविदा काढून विविध रेल्वेगाड्यात कंत्राट असलेल्या कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले आहे. बेस किचनमध्ये अन्न तयार करणाऱ्या कंत्राटदाराला रेल्वेतील कंत्राटदार किती अन्न पाहिजे, याची मागणी करतील. त्यानुसार बेस किचनमध्ये अन्न तयार होऊन ते संबंधित गाड्यातील प्रवाशांना पुरविण्यात येणार आहे. आगामी १५ दिवसांत बेस किचनमध्ये अन्न तयार करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. बेस किचन बंद असल्यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकावरील स्टॉल्सवर खाद्यपदार्थ विकत घेऊन आपली भूक भागवावी लागत होती; परंतु आता बेस किचन सुरू झाल्यामुळे त्यांना आपल्या आवडीनुसार ताजे खाद्यपदार्थ आणि भोजन मिळणार आहे.

या गाड्यात पुरविणार खाद्यपदार्थ

नागपूर रेल्वेस्थानकावर असलेल्या बेस किचनमधून तयार झालेले अन्न सुरुवातीला १२ रेल्वेगाड्यात पुरविण्यात येणार आहे. यात बंगळुरू राजधानी एक्स्प्रेस, सिकंदराबाद दुरांतो, हावडा दुरांतो, चेन्नई दुरांतो, आझाद हिंद एक्स्प्रेस, समरसता एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस आणि संघमित्रा एक्स्प्रेसचा समावेश आहे.

प्रवाशांना दर्जेदार भोजन देणार

‘बेस किचनमध्ये भोजन तयार करताना स्वच्छता आणि भोजनाच्या दर्जा राखण्यात येतो. त्यामुळे आयआरसीटीसीतर्फे प्रवाशांना दर्जेदार भोजन देण्याचा प्रयत्न राहणार आहे.’

-मनोज कुमार, प्रादेशिक अधिकारी, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशन, नागपूर

.............

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेfoodअन्न