शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतीन वर्षानंतर सापडला नागपुरातील कुख्यात इच्छू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 00:40 IST

मकोकात वॉन्टेड असलेला मोमिनपुऱ्यातील इप्पा टोळीतील इर्शाद ऊर्फ इच्छू खान पावणेतीन वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसील पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इच्छूला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

ठळक मुद्देमकोकात होता वॉन्टेड : तहसील पोलिसांची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मकोकात वॉन्टेड असलेला मोमिनपुऱ्यातील इप्पा टोळीतील इर्शाद ऊर्फ इच्छू खान पावणेतीन वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसील पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इच्छूला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.इच्छू मकोकांतर्गत तुरुंगात असलेल्या इप्पा आणि नौशादचा भाऊ आहे. इप्पा टोळीची एकेकाळी मोमिनपुरा परिसरात दहशत होती. २५ डिसेंबरला इप्पा टोळीने प्रतिस्पर्धी इम्मू काल्याला ‘तू हमारी तरफ आंख उठाकर देखता है, हमारी बात सुनता नहीं’ असे सांगून तलवारीने हल्ला केला. या घटनेनंतर पोलीस इप्पा टोळीचा शोध घेत होते. गुन्हे शाखेला इप्पा साथीदारांसह मोतिबागमध्ये असल्याची माहिती मिळाली. तेथे पोहोचल्यानंतर इप्पा टोळीने सहायक पोलीस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर इप्पा टोळीवर मकोकाची कारवाई करण्यात आली होती. इप्पा-नौशाद आणि त्यांचे साथीदार तुरुंगात आहेत. त्यानंतर इच्छू पोलिसांना चकमा देत फिरत होता. मंगळवारी पहाटे पोलिसांना इच्छू डोबीनगर झोपडपट्टीत आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी योजना आखली. ते इच्छूच्या घरासमोरील झोपडीत शिरले. तेथे इच्छू पोलिसांच्या हाती लागला. इच्छूला अटक केल्यामुळे तहसील पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. इच्छूची चौकशी केल्यास शहरातील अनेक गुन्हेगारांची माहिती मिळू शकते. त्याला न्यायालयासमोर हजर करून १२ दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयेश भांडारकर, दिलीप सागर, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, प्रशांत राठोड, सहायक उपनिरीक्षक संजय दुबे, हवालदार प्रमोद शनिवारे, सुनील ठाकूर, संजय मिश्रा, शंभू सिंह, शिपाई मनीष रामटेके, सुरज ठाकूर, कृष्णा चव्हाण, पुरुषोत्तम जगनाडे, रंजित बावणे, किशोर गरवारे, नजीर शेख, गगन यादव, नितीन राठोड, विकास यादव, ज्योती शर्मा यांनी पार पाडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक