शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे डांबरीकरण दसऱ्यानंतर

By admin | Updated: September 19, 2015 04:00 IST

उपराजधानीत बहुतांश रस्त्यांची स्थिती वाईट आहे. खड्डे पडले आहेत. ही परिस्थिती पाहता डांबरीकरणाचे प्रस्ताव तयार केले जात आहेत.

स्थायी समितीची मंजुरी : ३.६६ कोटींचे प्रस्ताव नागपूर : उपराजधानीत बहुतांश रस्त्यांची स्थिती वाईट आहे. खड्डे पडले आहेत. ही परिस्थिती पाहता डांबरीकरणाचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. मात्र, सध्याच डांबरीकरण होण्याची चिन्हे नाहीत. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३ कोटी ६६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, दसऱ्यानंतरच कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रस्त्यांच्या कामासाठी काही प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली तर काहींच्या निविदा काढल्या जातील. त्यामुळे काम सुरू होण्यास थोडा विलंब होईल. तसेही मान्सूनच्या काळात डांबरीकरण केले जात नाही. सामान्यत: दसऱ्यानंतर डांबरीकरणाचे काम सुरू होईल. रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी हॉटमिक्स विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. गणेश विसर्जन लक्षात घेता विसर्जन मार्गावरील खड्डे भरले जात आहेत. कंत्राटदारांनी जास्त दराने निविदा भरल्याबाबत सिंगारे म्हणाले,डीआरएवर पुन्हा कृपा हुडकेश्वर-नरसाळा येथे पाणीपुरवठा योजनेसाठी ६३.०५ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाचा डीपीआर व निविदेचा आराखडा तयार करण्याचे काम मे. डीआरए कन्सलटंट प्रा. लिमिटेड यांना देण्यात आले आहे. संबंधित कंपनीला प्रकल्पाच्या दोन टक्के रक्कम दिली जाईल. यावर सिंगारे म्हणाले, २००९ मध्ये तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी धोरण निश्चित केले होते. त्यानुसार महापालिकेच्या अधिकृत कन्सलटंटच्या पॅनलकडूनच डीपीआर तयार करावा लागतो. एलबीटी अनुदानाची प्रतीक्षा एलबीटी रद्द झाल्यानंतर राज्य सरकारकडून महापालिकेला दरमहा एक निश्चित अनुदान मिळणार आहे. सिंगारे यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये महापालिकेच्या खात्यात ३३.९८ कोटी रुपये जमा होतील. या संबंधीचा शासकीय आदेश जारी झाला आहे. तीन- चार दिवसात रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा होईल. विशेष म्हणजे गणेशोत्सव सुरू झाला असला तरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेले नाही. १५ सप्टेंबरपर्यंत महापालिकेच्या खात्यात फक्त ८ कोटी रुपये शिल्लक होते, अशी माहिती आहे.