शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

नागपुरात कारवाईनंतरही स्कूल बस बेलगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 21:02 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम तयार करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आतापर्यंत १५६ वर स्कूल बस व व्हॅनवर कारवाईही केली.

ठळक मुद्दे१५६ वाहने नियमबाह्यविद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

आॅनलाईन लोकमतनागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम तयार करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आतापर्यंत १५६ वर स्कूल बस व व्हॅनवर कारवाईही केली. तरीही नियमांना धुडकावून शेकडो स्कूल बस व व्हॅन रस्त्यावर धावत आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. आरटीओनेही याला आता गंभीरतेने घेत कारवाईची गती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.उपराजधानीतील बहुसंख्य शाळेतील सुमारे ४० टक्के विद्यार्थी स्कूल बस, ३० टक्के विद्यार्थी स्कूल व्हॅन तर १० टक्के विद्यार्थी हे आॅटोरिक्षांमधून प्रवास करतात. म्हणूनच विद्यार्थी वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून ओळखले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक करणाºया स्कूल बस व व्हॅनसाठी विशिष्ट नियमावली तयारी करण्यात आली. या नियमानुसार शहरात स्कूल बस व व्हॅनचा वेग ताशी ४० कि.मी. तर ग्रामीण भागात ताशी ५० कि.मी. पेक्षा जास्त असता कामा नये असे नियम घालून दिले. यासाठी स्पीड गव्हर्नर (वेग गतिरोधक) बसविण्याची सक्ती केली. परंतु काही स्कूल बस व व्हॅन चालक या स्पीड गव्हर्नरमध्ये गडबड करून वेग वाढवून घेतात व जास्त पैशांच्या लोभापायी जास्तीत जास्त फेरया मारतात. आरटीओच्या तपासणीत दोषी आढळून येणारया अशा स्कूल बस व व्हॅनवर जप्तीची कारवाई केली. मोटार वाहन निरीक्षकांसमोर नवीन स्पीड गव्हर्नर लावून नंतरच वाहन सोडून देण्यात आले. परंतु पुन्हा-पुन्हा या यंत्रात गडबड करीत असल्याचा प्रकार समोर येत आहेत. परिणामी, आजही शेकडो स्कूल बस व व्हॅन बेलगाम धावत आहेत. या शिवाय नियमानुसार स्कूल बसमध्ये मदतनीस आवश्यक आहे. लहान मुले व विद्यार्थिनींच्या बसमध्ये महिला मदतनीस ठेवण्याचा नियम आहे, बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थ्यांच्या नावाची यादी व पालकांचे संपर्क क्रमांक, वाहनात शाळेची दप्तर ठेवण्यासाठी व्यवस्था असणे, आपत्कालीन दरवाजा असणे, वाहनाच्या दरवाज्यास चाईल्ड लॉक असणे, प्रथमोपचाराची पेटी असणे, वाहनामध्ये धोक्याचा इशारा देणारे इंडिकेटर्स बसविणे, वाहनामध्ये अग्निशमन यंत्र आसन क्षमतेनुसार असणे, विद्यार्थ्यांना चढताना व उतरताना आधारासाठी दरवाजाजवळ लोखंडी दांडा असणे यासारखे अनेक नियम आहेत. परंतु यातील बहुसंख्य नियम काही स्कूल बस व व्हॅनचालक पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत.ग्रामीणतर्फे ७७ तर शहरतर्फे ७९ वाहनांवर कारवाईनागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयातर्फे एप्रिल ते आॅक्टोबर दरम्यान ७७ स्कूल बस व व्हॅनवर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून २ लाख ६८४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर शहर आरटीओ कार्यालयातर्फे याच कालावधीत ७९ स्कूल बस व व्हॅनवर कारवाई करण्यात आली. यांच्याकडून १ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.कारवाईचा वेग वाढविणारनागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाकडून स्कूल बस व व्हॅन तपासणी कारवाई वेळोवेळी केली जाते. या महिन्यापासून या कारवाईला आणखी गती देण्यात येईल. दोषी आढळून येणारया वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही वायु पथकांना देण्यात आले आहे.-श्रीपाद वाडेकरप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण