शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

उन्हानंतर वाढणार तुरीचे भाव : आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:42 IST

कळमन्यात सध्या आर्द्रता असलेली आणि नरम तुरीची आवक १० दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत १८ ते २० हजार क्विंटल तूर बाजारात विक्रीस आली. शनिवारी १८०० क्विंटल आवक होती. भाव ५१२२ रुपये होता. उन्हानंतर भाव वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे सोयाबीनचे भाव उतरले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमन्यात सध्या आर्द्रता असलेली आणि नरम तुरीची आवक १० दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत १८ ते २० हजार क्विंटल तूर बाजारात विक्रीस आली. शनिवारी १८०० क्विंटल आवक होती. भाव ५१२२ रुपये होता. उन्हानंतर भाव वाढण्याची शक्यता आहे.गावराणी तुरीला मागणीकळमना धान्य बाजाराचे अडतिया कमलाकर घाटोळे म्हणाले, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीची लागवड जास्त असली तरीही पावसामुळे बरेच पीक खराब झाले आहे, शिवाय नवीन तूर बाजारात येण्यास उशीर झाला. दहा दिवसांपासून आवक सुरू असून उन्हानंतर भाववाढीची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच काळात ५,२०० ते ५,३०० रुपये भाव होते. नागपुरी गावराणी तूर बारीक आणि स्वादिष्ट असते. त्यामुळे अन्य राज्यात जास्त मागणी आहे. कर्नाटक येथील तूर जाड असल्यामुळे दाल मिल मालकांकडून मागणी कमी असते. कळमन्यात नागपूर जिल्ह्यातून काटोल, सावनेर, मौदा, कुही, मांढळ, उमरेड, गुमथळा येथून आणि हिंगणघाट व मध्य प्रदेशातून तूर विक्रीस येते. खरेदीचा सीझन मार्च-एप्रिलपर्यंत असतो. तसे पाहता खरेदी वर्षभर सुरू असते. कमी उत्पादन आणि मागणी वाढल्यानंतर तुरीचे भाव आणखी वाढू शकतात, असे घाटोळे म्हणाले.त्याचप्रमाणे यावर्षी हरभऱ्याचा पेरा जास्त असला तरीही पावसामुळे ५० टक्के माल खराब झाला आहे. त्यानंतरही गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त हरभरा बाजारात येणार आहे. काही दिवसांत आवक सुरू होणार आहे. नवीन माल येण्याच्या शक्यतेने ४,३०० रुपयांवर पोहोचलेले भाव कमी झाले आहेत. सध्या जुन्या हरभºयाची विक्री सुरू असून, भाव प्रति क्विंटल ३,८०० ते ३,९०० रुपयादरम्यान आहे.‘कोरोना’च्या भीतीने सोयाबीनच्या भावात घसरणकोरोना व्हायरसची भीती भारतात दिसून येत आहे. पशुखाद्य म्हणून सोयाबीन ढेपचा कुक्कुटपालन उद्योगात मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. चिकनची मागणी कमी झाल्याचा परिणाम पशुखाद्याच्या विक्रीवर झाला आहे. १०० किलो सोयाबीनपासून १७ ते १८ टक्के खाद्यतेल आणि ६५ टक्के ढेप (डीओसी) निघते. ढेपची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कळमन्यात प्रति क्विंटल ४३०० रुपयांवर पोहोचलेले सोयाबीनचे भाव ४ हजारांपर्यंत कमी झाले आहे. सध्या दरदिवशी ८०० ते १००० हजार पोत्यांची आवक आहे. पुढे काही दिवस हीच परिस्थिती राहिल्यास भाव आणखी कमी होतील, असे कमलाकर घाटोळे यांनी सांगितले.

टॅग्स :foodअन्नInflationमहागाई