शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाच्या दणक्यानंतर आली जाग

By admin | Updated: January 21, 2017 02:19 IST

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी धंतोली, रामदासपेठ व लक्ष्मीनगर परिसरातील अनेक अतिक्रमणावर हातोडा

नागपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी धंतोली, रामदासपेठ व लक्ष्मीनगर परिसरातील अनेक अतिक्रमणावर हातोडा चालविला. यात धंतोली परिसरातील अनेक रुग्णालयांनी पार्किंगसाठी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच १० हजार रुपयांच्या डिमॉलेशन शुल्काचाही भरणा केला. यानंतर मनपाच्या पथकाने अवंती हॉस्पिटलच्या पार्किंगसह कॅन्टिनचे शेड तोडले. दरम्यान अवंती हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने सुद्धा १० हजार रुपयांचे डिमॉलेशन शुल्क जमा केले. यानंतर बरडे बिल्डिंगमधील डीटीडीसी कुरिअर कार्यालयाचे पार्किंग हटवून अतिक्रमण केलेली मोठी जागा मोकळी करण्यात आली. तसेच संबंधित कुरिअर कंपनीवर दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पुढे सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील टीनाचे शेड काढण्यात आले. तसेच अवंती हॉस्पिटल शेजारच्या अ‍ॅड़ देशपांडे यांनी पार्किंगसाठी केलेले शेड हटवून त्यांच्याकडूनही दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. येथून मनपा पथकाने रामदासपेठकडे आपला मोर्चा वळविला. येथील वानखेडे आणि मनोज बिल्डिंगचे पार्किंग शेड तोडण्यात आले. तसेच दीक्षाभूमी पुढील फुटपाथवरील पुस्तकांची दुकाने आणि मूर्ती विक्रेत्यांना हटविण्यात आले. यानंतर लक्ष्मीनगर चौक ते आठ रस्ता चौकापर्यंत फुटपाथवरील दुकाने, चहा टपऱ्या, फुलांची दुकाने व भाजीपालावाल्यांचे अतिक्रमण उठवून, दोन हातठेले जप्त करण्यात आले. ही कारवाई धंतोली झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, अशोक पाटील, यादव, जांभुळकर, झोन अभियंता नरेंद्र भंडारकर, एस. बी. बागडे, मंजू शाह, संजय शिंगणे, जमशेद अली व शरद इरपाते यांनी केली.(प्रतिनिधी) वाहतूक विभागाची विशेष मदत या कारवाईत मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकासोबत वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. दरम्यान अनेक ठिकाणी अतिक्रमणकर्त्यांनी वाहतूक पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला.