शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

अर्न्स्ट अँड यंगच्या इशाऱ्यानंतरही पीएनबी गाफील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 10:13 IST

आंतरराष्ट्रीय कन्सल्टिंग फर्म अर्न्स्ट अँड यंगने मे २०१७ मध्ये गीतांजली जेम्स या कंपनीपासून व मेहुल चोकसीशी संबंधित नीरव मोदीसारख्या कंपन्यांपासून सावध राहण्याचा इशारा १५ बँकांच्या समूहाला दिला होता.

ठळक मुद्देगमावले ११,४०० कोटी सावध राहण्याचा दिला गेला होता इशारा

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय कन्सल्टिंग फर्म अर्न्स्ट अँड यंगने मे २०१७ मध्ये गीतांजली जेम्स या कंपनीपासून व मेहुल चोकसीशी संबंधित नीरव मोदीसारख्या कंपन्यांपासून सावध राहण्याचा इशारा १५ बँकांच्या समूहाला दिला होता. पण त्यानंतरही पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गाफील राहिली व परिणामी बँकेने ११,४०० कोटी गमावले.असा सनसनाटी खुलासा लोकमतशी बोलताना मुंबईतील प्रवर्तन निदेशालयातील (इडी) एका उच्चपदस्थ सूत्राने केला आहे. गीतांजली जेम्सकडे ३५ बँकांचे ७००० कोटी थकले आहेत.गेल्या दोन-तीन वर्षात मेहुल चोकसीच्या गीतांजली जेम्स जिली नक्षत्र व नीरव मोदीच्या सतत होणाऱ्या ‘प्रगती’शी या कंपन्यांचे बँक व्यवहार सुसंगत अथवा पारदर्शक नव्हते. त्यावरून काही बँकांनी या कंपन्यांकडे असलेल्या बलाढ्य रकमेच्या थकीत कर्जवसुलीबाबत चिंता व्यक्त केली होती. शेवटी नेमका काय प्रकार आहे त्याची चौकशी करण्यासाठी १५ बँकांच्या समूहाने अर्न्स्ट अँड यंग या फर्मची नेमणूक केली व मेहुल चोकसी, गीतांजली जेम्स, नीरव मोदी इत्यादी कंपन्यांची गोपनीय चौकशी करण्याचे काम सोपवले होते, अशी माहिती या सूत्राने दिली.मजेची बाब म्हणजे या १५ बँकांच्या समूहात पीएनबीसुद्धा होती. अर्न्स्ट अँड यंगने सर्वंकष चौकशी करून प्रोजेक्ट ज्युबेल्स या नावाचा गोपनीय अहवाल मे २०१७ मध्ये या बँक समूहाला दिला होता.या अहवालात गीतांजली जेम्स व संबंधित कंपन्या हिरेजडित जवाहिराच्या किमती अव्वाच्या सव्वा दाखवून बँकांकडून मोठाली कर्जे उचलत आहेत.पण या कंपन्यांजवळ कर्ज परत करण्यासाठी पुरेशी संपत्ती तारण स्वरूपात नाही. तेव्हा बँकांनी सावध राहावे असा स्पष्ट इशारा अर्न्स्ट अँड यंगने दिला होता, असेही या सूत्राने सांगितले.चौकशीदरम्यान गीतांजली जेम्सचे निर्यात व्यापारावर अधिक लक्ष असल्याची माहिती मिळाली पण त्यासंबंधी कुठलेही दस्तावेज अर्न्स्ट अँड यंगला मिळाले नाही. अनेक विदेशी ग्राहक कंपन्यांनी गीतांजलीशी व्यापार करण्यासाठी एकाच मध्यस्थाची नेमणूक केली असल्याचे सूत्राने सांगितले.हा अहवाल मिळाल्यानंतर मेहुल चोकसीच्या पत्नीच्या संपत्ती बाबतची माहिती मागवली होती. पण कर्जवसुली संबंधात कुठलीही कारवाई झाली नाही अशी माहिती या सूत्राने दिली.दरम्यान याबाबत पीएनबीची बाजू जाणून घेण्यासाठी लोकमतने बँकेचे मुंबईतील झोनल मॅनेजर विमलेश कुमार यांच्या कार्यालयाशी संपर्क केला असता या प्रकरणाबाबत बँकेच्या दिल्ली मुख्यालयाशी बोला असे उत्तर मिळाले. दिल्ली मुख्यालयातही कुणी ज्येष्ठ अधिकारी बोलायला तयार झाला नाही व ई-मेलवर पाठविलेल्या प्रश्नावलीला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा