शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
पंत म्हणाला; अशी Run Out ची विकेट नकोच! मग Jitesh Sharma नं गळाभेट घेत मानले आभार (VIDEO)
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
5
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
6
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
7
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
8
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
9
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
10
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
11
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
12
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
13
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
14
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
15
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
16
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
17
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
18
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
19
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
20
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण

पराजयानंतर आता ‘जय’चा शोध !

By admin | Updated: September 26, 2016 03:03 IST

मागील चार महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’ च्या शोधासाठी नागपूर वन विभागाने पुन्हा कंबर कसली आहे.

वन विभागाचा स्पेशल ड्राईव्ह : ‘जय’चे छायाचित्र जारी नागपूर : मागील चार महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’ च्या शोधासाठी नागपूर वन विभागाने पुन्हा कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील तीन दिवस ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबविला जाणार आहे. माहिती सूत्रानुसार नागपूर वन विभागाची फौज या ड्राईव्हसाठी सज्ज झाली आहे. शिवाय वन्यजीव विभागाने या अभियानातील प्रत्येक वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘जय’ ची ओळख व्हावी, यासाठी ‘जय’ चे दोन छायाचित्र जारी केले आहे. सोबतच पुढील तीन दिवस ‘जय’ च्या शोधासाठी जंगलात पायदळ पेट्रोलिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार उद्या (सोमवार) पासून या अभियानाला सुरुवात होत आहे. यात नागपूर वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर वनमजुरापर्यंतचा प्रत्येक कर्मचारी सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे, नागपूर वन विभागाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या वाघासाठी अशाप्रकारचा ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबविला जात असल्याची माहिती आहे. ‘जय’ मुळे संपूर्ण वन विभाग अस्वस्थ झाला आहे. यात वन्यजीव विभागातील काही अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. वन्यजीव क्षेत्रातील जाणकारांच्या मते, वन विभागाची ही धडपड केवळ औपचारिकता आहे. ‘जय’ सारखा वाघ चार महिने कधीच गप्प बसू शकत नाही. तो जंगलातील वन्यप्राण्यांची शिकार करण्याऐवजी पाळीवप्राण्यांना अधिक लक्ष्य करीत होता. असे असताना मागील चार महिन्यात त्याने एकाही पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याची घटना पुढे आलेली नाही. त्यामुळे त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचवेळी वन विभागातील काही अधिकारी सुद्धा दबक्या आवाजात ते मान्य करीत आहे. परंतु प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, कुणीही स्पष्ट बोलण्याचे धाडस करीत नाही. मात्र वन्यजीव क्षेत्रातील बहुतांश तज्ज्ञ आणि वन अधिकाऱ्यांकडून ‘जय’ जिवंत राहिला नाही. असेच संकेत मिळत आहे. त्यामुळे वन विभाग गाजावाजा करीत असलेल्या या ‘स्पेशल ड्राईव्ह’ वर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (प्रतिनिधी)...ही केवळ सारवासारव माहिती सूत्रानुसार ‘जय’ प्रकरणी नागपूर वन विभागाला प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. शिवाय पुढील १ आॅक्टोबरपासून वन्यजीव सप्ताह सुरू होत आहे. या उत्सवावर निश्चितच ‘जय’ चे सावट राहणार आहे. त्यामुळे नागपूर वन्यजीव विभागाची ही केवळ सारवासारव असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक सध्या संपूर्ण विदर्भात धो-धो पाऊस सुरू आहे. शिवाय संपूर्ण जंगल हिरवेगार झाले आहे. अशा स्थितीत वन अधिकारी आणि कर्मचारी घनदाट जंगलात पायी फिरून खरंच ‘जय’ चा शोध घेणार का, असा या निमित्ताने सवाल उपस्थित केला जात आहे.