शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ मातेने मुलाला ठेवले अवयवरूपी जिवंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 19:01 IST

नियतीसमोर सर्वच प्रयत्न थिटे पडले. अखेर तिने मुलाला अवयवरूपी जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तिघांना जीवनदान मिळाले तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. सोमवारी या मातेच्या मुलाचे यकृत ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या मदतीने पुणे येथे पाठविण्यात आले.

ठळक मुद्देमातेच्या निर्णयाने तिघांना मिळाले जीवनदानग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने यकृत गेले पुण्याला

आॅनलाईन लोकमतनागपूर : एका अपघातात गंभीर जखमी होऊन मेंदू मृत (ब्रेन डेड) झालेल्या २२ वर्षीय तरुण मुलाचे अवयव दान करण्याचा त्या मातेने निर्णय घेतला. परंतु नंतर त्याच्यातील प्रकृतीत काहीशी सुधारणा होत असल्याचे दिसून आल्याने डॉक्टरांना आणखी दोन दिवस थांबण्याची विनंती केली. परंतु नियतीसमोर सर्वच प्रयत्न थिटे पडले आणि शेवटी तिने मुलाला अवयवरूपी जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तिघांना जीवनदान मिळाले तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. सोमवारी त्या युवकाचे यकृत ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या मदतीने पुणे येथे पाठविण्यात आले.वर्धा येथील सामान्य कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा. कोल्हापूर येथून त्याने केमिकल इंजिनीअरिंग केले. २२ नोव्हेंबर रोजी ‘इंट्रन्स’ परीक्षेसाठी नागपुरात आला असताना ‘एलआयटी’ कॉलेजसमोरून तो आणि त्याचा मित्र दुचाकीवरून जात असताना अचानक ब्रेक लागल्याने हा गाडीवरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार बसला. त्याला तातडीने एका खासगी हॉस्पिटलमध्ये आणि तेथून नंतर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी तपासून तो ब्रेन डेड असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी कुटुंबीयांना अवयव दानाचा सल्ला दिला. मुलगा गेल्याच्या त्या दु:खातही त्याच्या आईने होकार दिला. परंतु मुलाच्या प्रकृतीत होत असलेली सुधारणा पाहता त्या मातेने आणखी दोन दिवस थांबण्याची विनंती केली. रविवारी हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. अजय कुर्वे, न्यूरोफिजिशिअन डॉ. केतन चतुर्वेदी, डॉ. अंकुर जैन, डॉ. अतुल सोमानी, डॉ. स्वाती लोहिया आदी त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. मात्र नियती जिंकली. रविवारी डॉक्टरांनी ‘ब्रेनडेड’ घोषित केले. त्या स्थितीतही आपल्या मुलाला अवयवरूपी जिवंत ठेवण्याचा निर्णय मातेने घेतला. विभागीय प्रत्यारोपण समितीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली. सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्या युवकाचे यकृत अ‍ॅम्ब्युलन्सने ‘ग्रीन कॉरिडॉर’ने विमानतळापर्यंत पोहचविण्यात आले. यात पोलीस उपायुक्त (वाहतूक) रवींद्र परदेसी यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. हॉस्पिटलचे प्रसिद्ध मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते व डॉ. सूर्यश्री पांडे हे मूत्रपिंड काढण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊन ‘झेडटीसीसी’च्या सूचनेनुसार एक किडनी वोक्हार्ट हॉस्पिटलच्या एका रुग्णाला तर दुसरी किडनी आॅरेंज सिटी हॉस्पिटलच्या एका रुग्णाला देण्यात आली. युवकाचे दोन्ही नेत्र माधव नेत्रपिढीला देण्यात आले. या दानामुळे तिघांना जीवनदान मिळाले तर दोघांच्या जीवनातील अंधार दूर होणार आहे. 

 

टॅग्स :doctorडॉक्टर