शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कारवाईनंतरही नियम पायदळी

By admin | Updated: October 26, 2014 00:15 IST

चौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाहीतर तोडायचा ही प्रवृत्ती शहरात वाढत आहे. शहरातील मोजकेच चौक सोडल्यास इतर चौकात वाहतूक पोलीसच राहत नाही.

वाहतूक सिग्नल तोडण्याची संख्या वाढली : पोलीस असतील तरच नियम पाळायचा!नागपूर : चौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाहीतर तोडायचा ही प्रवृत्ती शहरात वाढत आहे. शहरातील मोजकेच चौक सोडल्यास इतर चौकात वाहतूक पोलीसच राहत नाही. यामुळे बहुसंख्य चौकांमध्ये वाहनचालक सामूहिकपणे सर्रास सिग्नल तोडतात. ज्या चौकाच्या एका कोपऱ्यात सावलीत पोलीस उभे असतात तो मार्ग सोडल्यास इतर मार्गावरील लाल दिव्यात वाहन दामटतात. वाहतूक पोलिसांच्या अपुऱ्या संख्येमुळे सामूहिकपणे सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.आजच्या धावपळीच्या काळात सिग्नलवर लाल दिवा लागल्यावर काही सेकंद थांबण्याची तसदी अनेक वाहनचालक घेत नाहीत. अशा सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नियमानुसार दंड आकारण्यात येतो. अनेकवेळा थेट सिग्नल तोडून वाहनचालक निघून जातात, चौकांमध्ये एका कोपऱ्यात उभे असलेले वाहतूक पोलीस त्याकडे केवळ पाहत राहतात. एवढ्या दुरून त्यांना त्याच्या वाहनाची नंबरप्लेटही दिसून येत नाही. यातच सिग्नल तोडलेल्याची माहिती पुढील चौकातील पोलिसांनाही दिली जात नसल्याची धक्कादायक माहिती आहे.यांना कोण रोखणार?एखादा वाहनचालक सिग्नल तोडत असेल, तर वाहतूक पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात, मात्र शहरातील काही चौकांमध्ये सिग्नल लागल्यावरही वाहनचालक थांबण्याकडे दुर्लक्ष करीत वाहन पुढे नेतात. वाहतूक पोलीस थांबण्याची सूचना देतात, मात्र वाहनचालक त्याकडे कानाडोळा करीत भरधाव वेगात निघून जातात. एकाचवेळी अनेक वाहने सिग्नल तोडत असल्याने चौकातील वाहतूक पोलीस हतबल ठरतात.या चौकांमध्ये नियम तुटतातपंचशील चौक, लोकमत चौक, लक्ष्मीनगर चौक, दीक्षाभूमी चौक, प्रतापनगर चौक, सरदार वल्लभभाई पटेल चौक, बैद्यनाथ चौक, जगनाडे चौक, गंगाबाई घाट चौक, रेशीमबाग चौक, गोळीबार चौक, कमाल चौक, इंदोरा चौक, गीतांजली टॉकीज चौक, अलंकार टॉकीज चौक, ट्राफिक पार्क चौक, भोले पेट्रोल पंप चौक, काटोल रोड चौक, महाराजबाग चौक, अवस्थीनगर चौक, मानकापूर चौक, पत्रकार सहनिवास चौक, नंदनवन चौक, उत्थाननगर चौक आदी चौकांमध्ये हमखास नियम तुटताना दिसून येते. १०० ते २०० रुपये दंडसिग्नल तोडणे या गुन्ह्यासाठी वाहनचालकास १०० रुपये दंडाची शिक्षा आहे. तसेच सिग्नल तोडणारा वाहनचालक इशारा देऊनही थांबला नाही तर त्याच्याकडून २०० रुपये दंड आकारण्यात येतो.मात्र वाहतूक पोलिसांना एकाच वेळी सिग्नल तोडणाऱ्यांना रोखता येत नसल्याने अशाप्रकारे सिग्नल तोडणाऱ्यांची हिंमत वाढत आहे. यासाठी कठोर कारवाईची मागणी आहे.(प्रतिनिधी)