शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातले फुलझरी ७० वर्षानंतरही अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 10:29 IST

ऊर्जेचे हब असलेल्या नागपूर जिल्ह्यातील असे एक गाव आहे, जिथे स्वातंत्र्याला ७० वर्षे लोटल्यानंतरही वीज पोहचली नाही. या गावाचे नाव आहे फुलझरी.

ठळक मुद्देपुनर्वसनाच्या व्यथाआदिवासी म्हणतात जंगलापासून दूर करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऊर्जेच्या क्षेत्रात राज्याचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढतोच आहे. नागपूरला ऊर्जा हब म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अशा ऊर्जेचे हब असलेल्या नागपूर जिल्ह्यातील असे एक गाव आहे, जिथे स्वातंत्र्याला ७० वर्षे लोटल्यानंतरही वीज पोहचली नाही. या गावाचे नाव आहे फुलझरी. गाव निव्वळ ऊर्जेच्या बाबतीतच नाही, तर विकासाच्या बाबतीतही अंधारातच आहे. विशेष म्हणजे हे गाव बफर झोनमध्ये येत असल्याने, गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुढे ठाकला आहे. येथील आदिवासींचा वनविभागाशी वनांच्या सानिध्यात राहण्यासाठी लढा सुरू आहे.रामटेक तालुक्याच्या देवलापार जि.प. सर्कलमध्ये फुलझरी हे गाव येते. फुलझरी गावात ४२ आदिवासी कुटुंब राहत होते. व्याघ्र प्रकल्पासाठी शासनाने या गावाचे पुनर्वसन ४० किलोमीटर दूर संग्रामपूर जवळ केले. मात्र तेथे कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. गावातील २२ कुटुंब पुनर्वसनाच्या ठिकाणी गेले आहेत. आधी वनजमिनीजवळ शेती करणे आणि वनोपज हेच त्यांच्या जगण्याचे साधन होते. त्यामुळे पुनर्वसनाच्या ठिकाणी रोजगार नसल्याने, जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे.२० कुटुंब अद्याप फुलझरीमध्येच वास्तव्यास आहेत. त्यामुळे शासनाने या २० कुटुंबांना विकासापासून वंचित ठेवले आहे. वनविभागाने या गावाला गावबंदी केली आहे. गावात येण्यासाठी केवळ कच्ची पायवाट आहे. वन विभागाने लावलेल्या गेट मधूनच गावात प्रवेश करावा लागतो. तसेच गावात कोणत्याही प्रकारे वाहन आणता येत नाही. त्यामुळे काही सामान आणावयाचे असल्यास गेटपासून पायी आणवे लागते. वनविभागाने गावाला तारेच्या कुंपणाने घेरले आहे. पहारा लावण्यात आला असून पांदण रस्ते, तलावाकडे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. शेतातही जाऊ दिल्या जात नाही. आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, जिपचे उपाध्यक्ष शरद डोणेकर व तालुक्याचे समाजसेवक देवा वंजारी यांच्यासोबत प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी फुलझरी गावात पोहचले. तेव्हा गावकऱ्यांनी समस्यांची सरबत्तीच केली.आदिवासी गाव सोडायला तयार नाहीतपुनर्वसन झालेल्या ठिकाणी कोणत्याही मुलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गावातील अर्धी कुटुंबे अद्यापही गावातच वास्तव्याला आहेत. आम्हाला वाघ व सापांची भीती नाही. आम्ही त्यांची पूजा करतो. मात्र आम्हाला आमची जमीन व मातीपासून दूर करू नका, अशी व्यथा गावकऱ्यांची आहे.शाळेची दूरवस्थागावात अंगणवाडी असून येथे १० मुले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत ७ विद्यार्थी शिक्षण घेतात. गावात सुविधा नसल्याने एक शिक्षक देवलापार तर एक शिक्षिका नागपूर येथून अपडाऊन करतात. शाळेतील शौचालयाची दुरवस्था असून, त्याचा दरवाजाही तुटलेला आहे.

टॅग्स :Governmentसरकार