शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

१८ महिन्यानंतरही औषधांना ‘मुदत’च

By admin | Updated: July 26, 2014 03:00 IST

शासकीय रुग्णालयांना रेट कॉन्ट्रॅक्टवरील

‘आरसी’ला पुन्हा मुदतवाढ : डीएमईआरचे दुर्लक्षचसुमेध वाघमारे  नागपूरशासकीय रुग्णालयांना रेट कॉन्ट्रॅक्टवरील (दरकरार) उपलब्ध औषध खरेदीचा नियम आहे. जानेवारी २०१३ रोजी हे दर करार संपले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) त्याचवेळी नवे करार करायला हवे होते. परंतु १८ महिन्यानंतरही मुदतवाढ देऊन वेळ मारून नेली जात आहे. परिणामी औषध कंपन्या जुन्या किमतीवर औषधे देण्यास नकार देत आहेत. यातच मेडिकलच्या औषधांची दोन कोटींची बिले थकल्याने तुटवडा पडला आहे. डीएमईआरच्या उदासीनतेचा फटका सामान्य रुग्णांना बसत आहे. राज्यातील मेडिकल कॉलेज व रु ग्णालयांसाठी दरवर्षी साधारणपणे १०० कोटींच्या घरात औषध व रुग्णसाहित्याची खरेदी केली जाते. हे खरेदी डीएमईआरच्या दरकरार पद्धतीने होते. परंतु ३१ जानेवारी २०१३ ला दरकरार संपले. त्यानंतर चार वेळा दोन-दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ ३१ आॅक्टोबर २०१३ रोजी संपली. यामुळे औषधांची खरेदी प्रक्रिया बंद पडली. सामान्य सलाईन, मेनिटॉक सलाईनसह इतरही जीवनावश्यक औषधांचा तुटवडा पडला. बाह्यरुग्ण व आकस्मिक विभागात औषधांच्या नावाने ठणठणाट होता. अपघातग्रस्त व अनोळखी व्यक्ती आल्यास त्याचे नातेवाईक येईपर्यंत त्याच्यावर औषधोपचार होत नव्हते. अखेर डीएमईआरला जाग येऊन सहा महिन्यानंतर १ मार्च २०१४ रोजी जुन्याच दरकराराला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. मे महिन्यात दरकराराची संपलेली मुदत या महिन्यात परत सप्टेंबर-२०१४ पर्यंत वाढविण्यात आली. डीएमईआरच्या उदासीनतेमुळे दीड वर्षांपासून मुदतवाढच सुरू आहे. करारानुसार दर कराराच्या यादीतील अनेक कंपन्यांचा औषध पुरवठ्याचा कोटा संपला आहे. जुन्या किमतीवर औषध देण्यास यातील काही कंपन्या तयार नाहीत. परिणामी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांसाठी मोजकीच औषधे आहेत. विशेषत: मेडिकलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या दोन हजाराच्यावर रुग्णांवर आणि भरती असलेल्या दीड हजाराच्यावर रुग्ण औषधाच्या तुटवड्यामुळे प्रभावित झाले आहेत. बीपीएलच्या रुग्णांचेही हाल सुरू आहेत. दोन कोटींची बिले थकीत४औषधांचे नवीन दरकरार तयार करण्यासाठी डीएमईआर विशेष लक्ष देत नसल्याने अनेक कंपन्यांनी औषध देणे बंद केले आहे. ज्या कंपन्या औषध देत आहेत, त्याची बिले प्रलंबित आहेत. सुमारे दोन कोटींचे बिले थकल्याने येत्या काळात औषधांचा ठणठणाट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.