शहरं
Join us  
Trending Stories
1
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
2
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
3
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
4
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
5
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
6
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
7
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
8
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
9
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
10
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
11
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
13
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
14
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
15
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
16
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
17
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
18
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
19
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
20
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव

शिकागोत १५० वर्षानंतर पुन्हा ‘त्या’ भाषणाची गर्जना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:18 IST

संबंध भारतात प्रचंड गाजलेले नागपूरच्या कलावंतांची निर्मिती असलेले ‘स्वामी विवेकानंद’ हे नाटक आता सातासमुद्रापार अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्यास सज्ज झाले आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्दे‘स्वामी विवेकानंद’ नाटक सातासमुद्रापारप्रथमच नागपूरच्या नाट्यचमूचा अमेरिका दौरा निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संबंध भारतात प्रचंड गाजलेले नागपूरच्या कलावंतांची निर्मिती असलेले ‘स्वामी विवेकानंद’ हे नाटक आता सातासमुद्रापार अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्यास सज्ज झाले आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. विवेकानंदांच्या शिकागो भाषणाला होत असलेल्या दीडशेव्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर जुळून आलेला हा योग निश्चितच कलावंतांच्या मनाला उभारी देणारा असून, शहरात कार्यरत असलेल्या विविध नाट्यसंस्था व रंगकर्मींना चेतना देणारा आहे.महाराष्ट्र ही नाट्यनिर्मितीची भूमी आणि महाराष्ट्राचे नाट्यवेड अवघ्या भारतीयांना माहीत आहे. येथील नाटकांची भुरळ परदेशात वास्तव्यास असलेल्या मराठी नागरिकांमुळे, तेथील स्थानिक नागरिकांनाही लागली आहे. त्यामुळे, पुणे-मुंबई या व्यावसायिक नगरीत निर्मित होणारी कित्येक नाटके प्रत्येक महिन्यात परदेशवारी करून येत असतात. या परदेशवारीमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागते ते अमेरिकेचे. या देशात मोठ्या संख्येने मराठी माणसांसोबतच भारतीयांचे वास्तव्य आहे आणि मराठी नागरिकांमुळे, तेथील अमराठी भारतीय आणि स्थानिक नागरिकही नाटकांच्या प्रेमात आहेत. विशेष म्हणजे, नाटकांसाठी परदेशवारी करणाºया मुंबई-पुण्याच्या नाटकांसोबत आता, नागपूरचे नावही अंकित होणार आहे. ‘स्वामी विवेकानंद’ या हिंदी नाटकाचा दौरा अमेरिकेत निश्चित झाला असून, अमेरिकेत नागपूरचे नाटक जाणारी ही पहिलीच घटना आहे. शुक्रवारीच नाटकासंबंधीच्या व्हीजा प्रक्रियेची पूर्णत: झाली असून, सप्टेंबरमध्ये हे नाटक थेट अमेरिकेकडे उड्डाण भरणार आहे.‘स्वामी विवेकानंद’ या हिंदी-मराठी नाटकात स्वामी विवेकानंदांचे जीवन अधोरेखित करण्यात आले असून, विश्व धर्मसभेत दीडशे वर्षापूर्वी विवेकानंदांनी शिकागो येथे दिलेल्या संपूर्ण भाषणाचा समावेश या नाटकात करण्यात आला आहे. त्या घटनेला ११ सप्टेंबर २०१९ रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत असून, याच तारखेला या नाटकाचा १५० वा प्रयोग शिकागो येथेच सादर केला जाणार असल्याने, एक सुरेख योग जुळून आला आहे. त्यामुळे, दीडशे वर्षांपूर्वी धर्मसभेत गरजलेला स्वामी विवेकानंदांचा आवाज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी गरजणार आहे.आधी दुबई, आता अमेरिका - संजय पेंडसेयापूर्वी २०१७ मध्ये दुबईमध्ये या नाटकाचे तीन प्रयोग केले होते. त्यापूर्वीपासूनच या नाटकाचा १५० वा प्रयोग शिकागो येथे करण्याचा आमचा मानस होता. त्या प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या सहयोगाने पूर्णत: मिळाली आहे. आतापर्यंत या नाटकाचे १४९ प्रयोग पूर्ण झाले आहेत. दरम्यान या नाटकाचे अनेक प्रयोग मिळाले. मात्र, स्वामींच्या त्या भाषणाला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने, आम्ही या नाटकाचा १५० वा प्रयोग शिकागो येथेच करण्याचा निर्धार केला असल्याने, अमेरिका दौºयानंतर स्थगित केलेले सगळे प्रयोग करणार असल्याचे नाट्य निर्माते संजय पेंडसे यांनी सांगितले. अमेरिकेत सध्या सात प्रयोग निश्चित असून, प्रयोगाची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.स्वामींना महिलांची मानवंदनाया नाटकाचे लेखन शुभांगी भडभडे यांनी केले असून, दिग्दर्शनाची धुरा सारिका पेंडसे यांनी सांभाळली आहे. नागपुरातून थेट अमेरिकेत नाटक सादर करण्याचा मान या दोन्ही महिलांना मिळाला असून, नागपूरच्या इतिहासात त्यांची नोंद होणार आहे. दुबईच्या निमित्ताने, त्यांनी हा मान आधीच मिळवला हे विशेष.

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंद