शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅफकॉन्सने भाचीला हाताशी धरून आत्याचेही शेत खोदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

तहसीलदार, पोलिसात तक्रार, एक कोटीचे नुकसान

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समृद्धी महामार्गाचे मुख्य कंत्राटदार अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स व उपकंत्राटदार किती बेमुर्वतखोरपणे शेतकऱ्याच्या जमिनी मुरुमासाठी खोदून निकामी करत आहेत त्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.या प्रकरणात अ‍ॅफकॉन्स व तिच्या उपकंत्राटदाराने भाचीला प्रलोभन देत तिच्या आत्याचेही सामाईक शेत खोदून काढले व एक कोटीचे नुकसान केले आहे.

सेलू तालुक्यातील चारमंडल गावात वनिता दिवाकर मुंगुले व सुवर्णा मनोहर गलांडे या दोन महिलांच्या सामाईक मालकीचे सहा एकर शेत (सर्व्हे नं. २२१) आहे. वनिता या सुवर्णा यांच्या आत्या आहेत. जून २०१९ मध्ये अ‍ॅफकॉन्सचे मध्यस्थ रॉबर्ट व कादर बादशाह यांना परस्पर गाठून त्यांच्याशी मुरुम उत्खनन करण्याचा करार केला व केवळ पाच दिवसात १.५० ते १.७५ एकर शेत खोदून मुरुम काढून नेला. हे सर्व गैरप्रकार करताना अ‍ॅफकॉन्स वा त्याच्या मध्यस्थांनी वनिता मुंगुले यांची परवानगी तर घेतली नाहीच पण त्यांच्याशी किंवा त्यांचा मुलगा यशवंत मुंगुले याच्याशी संपर्कसुद्धा केला नाही.

‘लोकमत’शी बोलताना यशवंत मुंगुले म्हणाले, माझी आई वनिता ही क्षीरसमुद्रपूर येथे राहते, त्यामुळे शेताकडे क्वचितच जाते. जूनमध्ये नातेवाईकांनी शेतात मुरूम खुदाई सुरू असल्याचे सांगितले. चारमंडलला जाऊन पाहिले असता अ‍ॅफकॉन्स कंपनीची पोकलेन मशीन मुरुम खोदत असल्याचे दिसले. यानंतर दि. १७ जून २०१९ रोजी आईने सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांचेकडे लेखी तक्रार केली व त्याच दिवशी अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्सचे प्रकल्प अधिकारी अनिल कुमार यांचेकडेही तक्रार नोंदली. आमच्या शेताचे एक कोटीचे नुकसान झाले आहे ते भरून द्यावे, अशी मागणी आम्ही तक्रारीत केली. कारवाई न झाल्याने ३० आॅगस्ट २०१९ रोजी दहेगाव पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा तक्रार दिली.

सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी सांगितले की, वनिता मुंगुले यांची तक्रार मिळाली. परंतु, अ‍ॅफकॉन्सविरुद्व अशीच तक्रार कोझी प्रॉपर्टीजनेसुद्धा केली आहे. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार नेमके किती नुकसान झाले ते ठरविण्यासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानंतर कारवाई होईल.अ‍ॅफकॉन्सच्या उपकंत्राटदारांची दहशतअ‍ॅफकॉन्सच्या उपकंत्राटदाराने वनिता मुंगुले यांचे शेत जूनमध्येच खोदले होते, पण त्याची पोलीस तक्रार त्यांचा मुलगा यशवंत मुंगुले यांनी तब्बल दोन महिन्यांनी केली. यावरून अ‍ॅफकॉन्स व उपकंत्राटदारांनी किती दहशत पसरवली आहे ते कळते. अ‍ॅफकॉन्सची ही दंडेली रोखण्यासाठी आता जिल्हा व पोलीस प्रशासन काय कारवाई करते, त्याबद्दल औत्सुक्य आहे.