शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाची आत्महत्या

By admin | Updated: October 20, 2016 02:59 IST

एसएनडीएलचे कायदेशीर सल्लागार प्रफुल्ल कुमार गुप्ता यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नीला कोंडून घेतला गळफास : एसएनडीएलचे होते कायदेशीर सल्लागार नागपूर : एसएनडीएलचे कायदेशीर सल्लागार प्रफुल्ल कुमार गुप्ता यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सिरसपेठ येथील बजरंग अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री घडली.३२ वर्षीय प्रफुल्ल यांनी बजेरिया येथील मौसमी तिवारी यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. कुटुंबात पती-पत्नीसह दोन लहान मुलं (साडेपाच व आणि साडेतीन वर्ष) आहेत. मागील काही दिवसांपासून ते तणावात असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी ११ वाजता त्यांचा पत्नीसोबत थोडासा वाद झाला. प्रफुल्ल यांनी रागाच्या भरात पत्नीला बेडरूममध्ये बंद केले. यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन त्यांनी गळफास घेतला. पत्नीला याबाबत काहीच कल्पना नव्हती तिने दरवाजा उघडण्यासाठी खूप आवाज दिला. कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने ती चिंताग्रस्त झाली. अखेर तिने पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवर सूचना दिली. इमामवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले घरातील दरवाजा बंद असल्याने पोलिसांना काहीतरी अनर्थ घडल्याचा संशय आला. त्यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी मौसमीच्या खोलीचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रफुल्ल यांना दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा प्रफुल्ल फासावर लटकलेले होते. त्यांना तात्काळ मेडिकलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. प्रफुल्ल हे मूळचे यवतमाळ येथील रहिवासी होते. ते खूप वर्षांपासून नागपुरात राहत होते. त्यांचे शिक्षणही नागपुरातच झाले. घटनेची माहिती होताच त्यांचे नातेवाईकही यवतमाळवरून नागपुरात पोहोचले. त्यांनी मृतदेह यवतमाळला नेण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु बहुतांश नातेवाईक नागपुरातच राहत असल्याने त्यांचे अंत्यसंस्कार नागपुरात करण्यावर एकमत झाले. या घटनेमुळे शहरातील वकीलांमध्ये शोक पसरला आहे. प्रफुल्ल गुप्ता हे सर्वांशीच मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांचा स्वभाव सर्वांनाच आवडायचा. त्यांची वकिलीही चांगली चालत होती.(प्रतिनिधी)कुणीही मदत केली नाही पतीने रागात स्वत:ला आणि तिला खोलीत बंद करून घेतल्यानंतर चिंताग्रस्त मौसमीने मदतीसाठी शेजाऱ्यांना खूप आवाज दिला. खूप प्रयत्न करूनही कुणी मदतीसाठी आले नाही. शेवटी सर्वांकडून मदतीची अपेक्षा संपल्याने तिने पोलिसांना फोन केला. पोलीस दरवाजा तोडून आत आले. परंतु तेव्हापर्यंत उशीर झाला होता.