शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांनी कायद्याबाबत ‘अपडेट’ असावे : वरिष्ठ अधिवक्ता शेखर नाफडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 01:41 IST

प्रत्येक खटला हा वेगळा असतो. त्यामुळे त्याचे दस्तऐवज आणि युक्तिवाद प्रकरणनिहाय वेगवेगळे असतात. तेव्हा वकिलांना खटलेनिहाय मुद्दे, कायदा, सोबतच उच्च व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी घालून दिलेल्या निर्णयाची माहिती असावी. एकूणच वकिलांनी कायद्याबाबत ‘अपडेट’ असावे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता शेखर नाफडे यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देउच्च न्यायालयातील वकिलांसाठी वाचन कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येक खटला हा वेगळा असतो. त्यामुळे त्याचे दस्तऐवज आणि युक्तिवाद प्रकरणनिहाय वेगवेगळे असतात. तेव्हा वकिलांना खटलेनिहाय मुद्दे, कायदा, सोबतच उच्च व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी घालून दिलेल्या निर्णयाची माहिती असावी. एकूणच वकिलांनी कायद्याबाबत ‘अपडेट’ असावे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता शेखर नाफडे यांनी येथे व्यक्त केले.नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनने वकिलांसाठी वाचनकक्ष तयार केले आहे. या कक्षाचे उद्घाटन नाफडे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी हायकोर्ट बार स्टडी सर्कल कमिटीतर्फे त्यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात ‘दिवाणी, मूलभूत हक्क, निवडणूक आणि साक्ष नोंदणी आदी प्रकरणे आणि युक्तिवाद’ या विषयावर बोलत होते. व्यासपीठावर हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर प्रामुख्याने उपस्थित होते.सुरुवातीला अ‍ॅड. किलोर यांनी नाफडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी अ‍ॅड. नाफडे म्हणाले, अनेकदा वकिलांना कायद्यााची माहिती नसते व तशा प्रकरणात प्रत्येक न्यायालय वेगवेगळा निकाल देते. अशावेळी वकिलांनी सक्रिय असायला हवे . यावेळी त्यांनी काही खटल्यांची उदाहरणेही दिली. मुंबई बॉम्बस्फोटातील एका खटल्याचा त्यांनी उल्लेख केला. यात सरकारची बाजू मांडताना त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली आणि त्याचा निकाल नंतर सरकारच्या बाजूने कसा लागला, हेही समजावून सांगितले.प्रास्ताविक हायकोर्ट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी केले. संचालन अ‍ॅड. प्रीती राणे यांनी केले.सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार मानले.वकिलांसाठी अवांतर वाचनासाठी पुढाकारकायद्याच्या पुस्तकांसोबतच अवांतर वाचनही वकिलांना अनेकदा मदतीचेच ठरते. त्यामुळे त्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने वाचन कक्ष तयार करण्यात आला आहे. यात कायद्याच्या पुस्तकाव्यतिरिक्त कथा कादंबरी, आरोग्य, खेळ, महापुरुषांसह अनेक मान्यवरांचे आत्मचरित्र अशी तब्बल ५०० पुस्तके आहेत. याला न्यायमूर्ती व्हिावियन बोस रिडींग कॉर्नर असे नाव देण्यात आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयlibraryवाचनालय