शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’चा दुसराही मुहूर्त चुकला

By admin | Updated: August 3, 2014 00:52 IST

विदर्भाच्या विकासाबाबत सरकार किती गंभीर आहे, याचा प्रत्यय ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ -२’च्या आयोजनावरून आला आहे. २ आॅगस्ट रोजी ही परिषद होईल, ही तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी

नागपूर : विदर्भाच्या विकासाबाबत सरकार किती गंभीर आहे, याचा प्रत्यय ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ -२’च्या आयोजनावरून आला आहे. २ आॅगस्ट रोजी ही परिषद होईल, ही तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केलेली घोषणाही फोल ठरली आहे. यापूर्वी ही परिषद फेब्रुवारीमध्ये होणार होती, हे येथे उल्लेखनीय. २० आॅगस्टनंतर केव्हाही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, आता ही परिषद गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.विदर्भ विकासाच्या बाबतीत सरकार गंभीर आहे, हे या भागातील जनतेच्या मनावर बिंबविण्यासाठीच खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने गतवर्षी फ्रेब्रुवारी महिन्यात नागपुरात ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ही गुंतवणूकदारांची परिषद घेण्यात आली होती. दोन दिवसीय परिषदेत १४ हजार ५३४ कोटी रुपये गुंतवणुकीचे करार झाले होते. गुंतवणूकदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दरवर्षी ही परिषद आयोजित केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार फेब्रुवारी २०१४ मध्ये ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ-२’ होणे अपेक्षित होते. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली; ही माहितीही खुद्द मुख्यमंत्र्यांनीच नागपुरात दिली होती. निवडणुका झाल्यावर ही परिषद केव्हा होणार, याकडे उद्योगजगतासह वैदर्भीय जनतेचेही याकडे लक्ष लागले होते. मात्र निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिला. विशेष म्हणजे राणे यांच्या खात्याकडेच या परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी होती. काही दिवसांनी राणे यांनी पुन्हा सूत्रे स्वीकारल्यावर पुन्हा ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ -२’ची चर्चा सुरू झाली. तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर मोघे यांनी तारीख (२ आॅगस्ट) जाहीर केली होती. पण आता हा मुहूर्तही टळला आहे. यासंदर्भात उद्योग सहसंचालक कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला असता, परिषदेबाबत शासनाकडून अधिकृतरीत्या अद्याप काहीच कळविण्यात आले नाही, असे सांगण्यात आले. सध्या राणे यांनी पुन्हा राजीनामा दिल्याने सध्या उद्योग खात्याला मंत्री नाही. दुसरीकडे २० आॅगस्टनंतर केव्हाही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या परिषदेची व्याप्ती व करावी लागणारी तयारी लक्षात घेता त्यापूर्वी ती आयोजित करणे शक्य नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)