शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवोदय बँकेवर प्रशासक

By admin | Updated: June 15, 2017 02:04 IST

आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या नवोदय बँकेवर राज्याच्या सहकार आयुक्तांनी नागपूर जिल्ह्याचे उपनिबंधक सतीश भोसले

बँक आर्थिकदृष्ट्या डबघाईस : रिझर्व्ह बँकेची शिफारस लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या नवोदय बँकेवर राज्याच्या सहकार आयुक्तांनी नागपूर जिल्ह्याचे उपनिबंधक सतीश भोसले यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले आहे.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या (आरबीआय) शिफारशीनंतर राज्याच्या सहकार आयुक्तांनी सहकार कायद्याच्या ११० (अ) कलमांतर्गत ही कारवाई केली आहे. माजी आमदार अशोक धवड हे बँकेचे अध्यक्ष होते. नवोदय बँक दोन वर्षांपूर्वीच आर्थिक अडचणीत आली होती. बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणि नाजूक स्थितीत असल्याचा प्रचार एका माजी महाव्यवस्थापकाने केला होता. दोन वर्षांपूर्वी बँकेच्या ठेवी १२० कोटी आणि कर्जवाटप ९० कोटी रुपये होते. पण बँक आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्याचे ठेवीदार आणि खातेदारांना माहिती झाल्यानंतर त्यांनी ठेवी काढून घेतल्या. त्यामुळे ठेवी ९० कोटींपर्यंत कमी झाल्या. बँकेची आर्थिक स्थिती कमजोर झाल्यानंतर कर्जदारांनी कर्ज चुकते करण्यात दिरंगाई केली. अशा प्रकारे बँक मोठ्या आर्थिक संकटात आली. रिझर्व्ह बँकेचे व्यवहारावर निर्बंध नोव्हेंबर २०१६ मध्ये रिझर्व्ह बँकेने नवोदय बँकेवर ३५ (अ) कलमांतर्गत कारवाई करीत आर्थिक व्यवहारावर निर्बंध लावले. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी, हा हेतू होता. पण त्यानंतरही बँकेची आर्थिक स्थिती ढासळली. बँकेच्या ठेवींमध्ये घसरण सध्या नवोदय बँकेकडे ५२ कोटी रुपयांच्या ठेवी, कर्जवाटप ४८ कोटी आणि अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (एनपीए) ४५ कोटींवर गेले आहे. ५२ कोटींच्या ठेवींपैकी १९ कोटींच्या ठेवी एक लाख रुपयांच्या आत आहेत. त्या डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) अंतर्गत सुरक्षित आहेत. बँक निघू शकते अवसायनात रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांपूर्वी नवोदय बँकेवर ३५ (अ) कलमांतर्गत कारवाई केली होती. पण त्यानंतरही बँकेची आर्थिक स्थिती सुधारली नाही. आता रिझर्व्ह बँकेने चार महिने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार एक हजार रुपये विड्रॉलचे बंधन आहे. पण चार महिन्यातही बँकेची स्थिती न सुधारल्यास बँक अवसायनात निघू शकते. बँकेचा प्रशासकाने कार्यभार स्वीकारला आहे. एकूण पाच शाखांपैकी तीन शाखा बंद करून बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून भागभांडवल वाढविण्यासह कर्ज वसुलीवर सर्वाधिक भर देण्यात येणार आहे. याशिवाय तीन तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. ‘डीआयसीजीसी’ने एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना दिलेली रक्कम बँकेला परत करावी लागणार आहे. त्यानंतर एक लाखांवरील ठेवीदारांना रक्कम परत मिळेल. पण यापूर्वी बुडलेल्या तीन बँकांचा अनुभव पाहता ठेवीदारांना पैसे मिळालेले नाहीत. - सतीश भोसले, उपनिबंधक,नागपूर जिल्हा.