आमदारांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईत निर्णय नागपूर : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना कळमना कृषी बाजार समितीचे नवीन प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. स्थानिक आमदारांची मागणी आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला गांभीर्याने घेत या नियुक्तीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत घेतला. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सध्याच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपलेला आहे. यानंतरही कार्यकाळ वाढविण्याचा प्रयत्न पदाधिकारी करीत होते. परंतु उच्च न्यायालयाने सुद्धा एका निर्णयात कार्यकाळ वाढविण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. यासंदर्भात शहरातील सर्व आमदारांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेतली. त्यांना कळमना येथे प्रशासक नियुक्त करून तातडीने निवडणुका घेण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त निर्णय घेतला. यावेळी आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कळमना बाजार समितीवर प्रशासक
By admin | Updated: March 23, 2017 02:15 IST