शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

अभियंत्यांच्या पदोन्नतीसाठी प्रशासकीय गोलमाल

By admin | Updated: July 20, 2015 03:10 IST

महापालिकेत प्रकाश व जलप्रदाय विभागाच्या स्थापनेवर कार्यरत कनिष्ठ अभियंता यांना उप अभियंता म्हणून पदोन्नती देण्यासाठी ...

महापालिकेच्या सभेत प्रस्ताव : त्रुटींमुळे विरोधाची शक्यतानागपूर : महापालिकेत प्रकाश व जलप्रदाय विभागाच्या स्थापनेवर कार्यरत कनिष्ठ अभियंता यांना उप अभियंता म्हणून पदोन्नती देण्यासाठी तसेच उपअभियंता म्हणून कार्यरत असलेल्यांना कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती देण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड सुरू आहे. २० जुलै रोजी होऊ घातलेल्या महापालिकेच्या सभेत या संबंधिचा प्रस्तावही प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रस्ताव अनेक त्रुटी असून या संबंधात न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांकडेही सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.महापालिका सभेच्या विषय पत्रिकेत पदोन्नतीबाबत दाखविण्यात आलेल्या विषय क्रमांक ९४ व ९६ बाबत आक्षेप आहेत. प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव व या प्रस्तावाशी संबंधित न्यायालयाने दिलेले निर्देश पाहिले असता प्रशासनाने सोयीस्कर अर्थ उचलल्याचे स्पष्ट होते. महापालिकेने १ जानेवारी १९९८ ते ४ डिसेंबर १९९९ रोजी कनिष्ठ अभियंता पदावरून उपअभियंता पदावर केलेल्या पदोन्नती या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पदावर कार्य करू शकत नाही. या संबंधीचे तीन महिन्याच्या आत उपअभियंता पदावर पदोन्नती करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. मात्र, महापालिका सभेच्या विषय क्रमांक ९४ मध्ये नमूद केलेल्या पदोन्नती नियमित करण्याचा विषय सभागृहापुढे ठेवण्यात आला आहे. ही न्यायालयाची दिशाभूल आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यालयाने घेतलेल्या कायद्याच्या अभिप्रायानुसार १ जानेवारी १९९८ पासून पदवीधर कनिष्ठ अभियंता पदातून उपअभियंता पदावर पदोन्नती करणे अत्यावश्यक आहे. मात्र, कार्यालयाने कायदेशीर अभिप्रायाच्या विरोधात प्रस्ताव सभागृहापुढे सादर केला आहे. महापालिकेने केलेल्या तात्पुरत्या पदोन्नती नाकारून पुन्हा पदोन्नती करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश होते. मात्र, असे असतानाही प्रशासनाने रद्द केलेल्या पदोन्नती नियमित करण्याची तयारी चालविली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापौर असताना पदोन्नतीबाबत तीन धोरणात्मक निर्णय घेण्यात आले होते. शासनाच्या २७ मार्च १९७२ च्या परिपत्रकानुसार उर्वरित कनिष्ठ अभियंत्यांची सेवाज्येष्ठता यादी वेगवेगळी करण्यात यावी. सहायक अभियंत्यांची १३ पदे, उपअभियंता या पदामध्ये समाविष्ट करण्यात यावी व त्यांचे पदनाम उपअभियंता हेच संबोधण्यात यावे. तसेच, यापुढे उपअभियंतापदी कार्यरत अभियंत्यांपैकी, पदवीधारकांना उपविभागीय अभियंता व पदवीधारकांना उपविभागीय अधिकारी असे संबोधण्यात येऊन कार्यकारी अभियंता या पदी पदोन्नती देताना ६७ टक्के जागा उपविभागीय अभियंत्यांमधून व ३३ टक्के जागा उपविभागीय अधिकारीमधून पदोन्नती मंजूर करावी, असे तीन निर्णय घेण्यात आले होते. मात्र, या तीन निर्णयांपैकी दुसरा व तिसऱ्या निर्णयाची अंमलबजावणी कार्यालय करीत असून निर्णय क्रमांक १ सोयीस्कररीत्या दडवून ठेवला जात आहे. प्रत्यक्षात निर्णय क्रमांक १ हा शासनाच्या परिपत्रकानुसार घेतलेला निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका क्रमांक ३८०७/२०१४ या याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून विषय क्रमांक ९४ व ९६ मंजुरीसाठी २० जुलै रोजी महापालिका सभागृहासमोर ठेवण्यात येणार आहेत. प्रत्यक्षात या याचिकेत तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय क्रमांक १ नुसार प्रकाशित पदवीधर, कनिष्ठ अभियंता ज्येष्ठता यादी ३ डिसेंबर १९९८ कायम ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून अंतिम चर्चेसाठी प्रलंबित आहे. यामुळे प्रशासनाने सभागृहात ठेवलेला विषय सभागृहाची दिशाभूल करणारा आहे. परिणामी या मुद्यावर सभागृहात विरोध होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)