शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कळमना मार्केटबाबत प्रशासन गंभीर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 21:01 IST

कळमना मार्केटमध्ये सोईसुविधांचा अभाव आणि प्रशासन ढिम्म असल्यावर प्रकाश टाकणारी बातमी लोकमतने शुक्रवारी कळमना मार्केट बनतेय ‘हॉटस्पॉट या मथळ्याखाली प्रकाशित केल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ : उपाययोजना व साफसफाईचा अभाव, लिलावावेळी गर्दी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमना मार्केटमध्ये सोईसुविधांचा अभाव आणि प्रशासन ढिम्म असल्यावर प्रकाश टाकणारी बातमी लोकमतने शुक्रवारी कळमना मार्केट बनतेय ‘हॉटस्पॉट या मथळ्याखाली प्रकाशित केल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. कॅबिनमध्ये बसून कारभार करण्याऐवजी मार्केट परिसरात फिरून कोरोनावर कसे नियंत्रण मिळविता येईल, यावर वरिष्ठ अधिकारी स्तरावर मंथन करण्यात आले. शुक्रवारी सर्वच बाजारपेठा बंद असतानाही स्वच्छता आणि साफसफाईवर भर देण्यात आला नाही. या संदर्भात प्रशासक राजेश भुसारी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता होऊ शकला नाही. त्यामुळे मार्केटमध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा खुलासा झाला नाही.लोकमतच्या बातमीची जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक राजेश भुसारी यांना विचारण करण्यात आल्याची माहिती आहे. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा-बटाटा बाजार अडतिया वेलफेअर असोसिएशन, कळमना धान्यगंज अडतिया, युवा अडतिया सब्जी असोसिएशन, कळमना होलसेल मिरची मार्केट असोसिएशन, कळमना फ्रूट मार्केट असोसिएशन, होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशन आदी सहा बाजार आहे. या बाजारांमध्ये दरदिवशी १४ ते १५ हजार लोकांची गर्दी आहे. प्रशासकाचा वरदस्त नसल्याने कुणीही सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. पावसाळ्यामुळे धान्य बाजारात गर्दी नसते, पण भाजी बाजार आणि फळ बाजारात दरदिवशी होणारी गर्दी नेहमीचीच आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्याची प्रशासकाची जबाबदारी आहे. पण ते बाजाराची पाहणी करण्याऐवजी कॅबिनमध्ये बसूनच कारभार करतात, असा आरोप नाव न सांगण्याच्या अटीवर काही व्यापाऱ्यांनी केला. कळमना मार्केटबाबत प्रशासक गंभीर नाही. प्रशासकाने पूर्वीपासूनच गर्दी होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या असत्या तर आज मार्केटवर ही वेळ आली नसती, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.फळांच्या लिलावावेळी असते गर्दीसध्या मोसंबीचा हंगाम सुरू आहे. सध्या नागपूर जिल्ह्यातून २५० पेक्षा जास्त टेम्पोतून मोसंबी बाजारात येते. शनिवारी फळांचा लिलाव असतो. त्यावेळी शेतकरी, ग्राहक, व्यापारी आणि अडतियांची प्रचंड गर्दी असते. हजारापेक्षा जास्त लोक दाटीदाटीने उभे असतात. यातून कोरोना संसर्गाचा जास्त धोका असतो. अनेकजण लिलावातून कोरोना घेऊन गावाकडे परततात. या माध्यमातून गावागावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याचा आरोप काही ग्राहकांनी केला आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन प्रशासक राजेश भुसारी यांनी कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Marketबाजारcorona virusकोरोना वायरस बातम्या