लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी हलबांच्या संविधानिक न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने गोळीबार चौकातून संघर्ष यात्रा काढली. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आदिवासी हलबांनी हातात ताट-वाटी घेऊन शासनविरोधी घोषणा देत आपले रुद्र रूप शासनाला दाखविले.राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेत हजारो आदिवासी हलबा रस्त्यावर उतरले. गोळीबार चौकातून संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत महिला ताट-वाटी वाजवत सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत होत्या. आंदोलनाचे नेतृत्व अॅड. नंदा पराते यांनी केले. यावेळी विश्वनाथ आसई, दे. बा. नांदकर, प्रकाश निमजे, धनंजय धापोडकर, रेखा बल्लारपुरे, किरण बारापात्रे, गीता जळगावकर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीने आदिवासी हलबांचा विश्वासघात केल्याचा आरोप करून, आगामी निवडणुकीत याचा परिणाम भोगावा लागेल, असा इशारा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. भाजप शासनाने आश्वासन देऊनही मागील चार वर्षात हलबा जमातीच्या ऐतिहासिक पुराव्यावर आधारित जाती व वैधता दाखला देण्यासाठी जीआर काढला नाही. त्यामुळे शासनाने हलबांना न्याय न दिल्यास हलबा बचाव-बीजेपी हटावची मोहीम सुरू करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात मनोहर घोराडकर, ओमप्रकाश पाठराबे, लोकेश वट्टीघरे, बबलू निनावे, शकुंतला वट्ठीघरे, गीता आमनेरकर, अनिता हेडाऊ, मंजू पराते, मंदा शेंडे, कल्पना अड्याळकर, रुपाली मोहाडीकर, कमल पराते, पुष्पा शेटे, गीता बंडोले, प्रमिला वाडीघरे, सरिता बुरडे, आशा चांदेकर, अलका दलाल, गीता बावणे, रेखा कोहाड, दमयंती बावणे, शारदा खवास, संगीता सोनक, सुषमा पौनीकर, प्रभावती देवघरे, शालू नंदनवार, लता खापेकर, हिरा पराते, कुंदा निनावे, कल्पना मोहपेकर, लीला मौंदेकर यांच्यासह हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.
आदिवासी हलबांच्या संघर्ष यात्रेने दाखविले उग्र रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:45 IST
आदिवासी हलबांच्या संविधानिक न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने गोळीबार चौकातून संघर्ष यात्रा काढली. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आदिवासी हलबांनी हातात ताट-वाटी घेऊन शासनविरोधी घोषणा देत आपले रुद्र रूप शासनाला दाखविले.
आदिवासी हलबांच्या संघर्ष यात्रेने दाखविले उग्र रूप
ठळक मुद्देशासनविरोधी नारेबाजी : चिटणीस पार्कमध्ये केले आंदोलन