शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपर मुख्य सचिव व्ही. के. गौतम यांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:00 IST

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन अभियंत्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याच्या प्रकरणात जलसंसाधन विभागाचे अपर मुख्य सचिव (जलसंपदा प्रकल्प व विकास) व्ही. के. गौतम यांना अवमानना नोटीस बजावून १६ मार्चपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देअभियंत्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे प्रकरण

 लोकमत न्यूज नेटवर्क   नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन अभियंत्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याच्या प्रकरणात जलसंसाधन विभागाचे अपर मुख्य सचिव (जलसंपदा प्रकल्प व विकास) व्ही. के. गौतम यांना अवमानना नोटीस बजावून १६ मार्चपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

संबंधित अभियंत्यांमध्ये नरेंद्र निमजे (उप-अभियंता) व रविकुमार पराते (अधीक्षक अभियंता) यांचा समावेश आहे. त्यांनी जलसंसाधन विभागामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून नोकरी मिळवली होती. त्यानंतर त्यांना अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयश आले. परिणामी, नोकरी धोक्यात आल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २००५ मध्ये उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता त्यांच्या नोकरीला संरक्षण प्रदान केले. दरम्यान, अपर मुख्य सचिवांनी २१ डिसेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयांतर्गत या अभियंत्यांना ११ महिने कालावधीच्या अधिसंख्य पदावर वर्ग केले. त्यानंतर त्यांची सेवा आपोआप समाप्त होणार आहे. हा निर्णय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारा असल्याचे अभियंत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे.

अवमानना कारवाई करण्याची मागणी

याचिकेवरील सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी याचिकाकर्त्यांना अधिसंख्य पदांवर वर्ग करण्याचा निर्णय अवैध असल्याचा दावा केला. याचिकाकर्त्यांच्या नोकरीला उच्च न्यायालयाने संरक्षण प्रदान केले आहे. त्यामुळे त्यांना अधिसंख्य पदांवर वर्ग करता येणार नाही असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. याशिवाय त्यांनी अपर मुख्य सचिवांवर अवमानना कारवाई करण्याची मागणी केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय