शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्र्यांच्याच नागपूरमधील वीज वितरणाला अदानी समूहाची ‘पॉवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 07:00 IST

Nagpur News येत्या काही महिन्यांत नागपुरातील वीज वितरण प्रणाली महावितरणऐवजी अदानी पॉवरच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआर्थिक संकटामुळे महावितरण अडचणीत राज्यातील १० शहरांवर समूहाची नजर

आशिष रॉय

नागपूर : येत्या काही महिन्यांत नागपुरातील वीज वितरण प्रणाली महावितरणऐवजी अदानी पॉवरच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. ऊर्जा मंत्रालयाने राज्यातील सोळा शहरांचे वीज वितरण खासगी परवानाधारकांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी पॉवरची नजर नागपूरसह इतर दहा शहरांवर आहे. डिसेंबर २०२१ मध्ये समूहाने शहरातील वीज यंत्रणेचे प्राथमिक सर्वेक्षण केले व १२-१३ फेब्रुवारी रोजी कंपनीच्या सात सदस्यीय चमूने आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखतीदेखील घेतल्या. सोमवारी अदानीच्या अधिकाऱ्यांनी महावितरणच्या कॉंग्रेस नगर विभागाचे सर्वेक्षण केले.

संबंधित यंत्रणा अदानी ट्रान्समिशनकडून ताब्यात घेण्यात येणार असून ही सूचीबद्ध कंपनी आहे. ‘सेबी’च्या नियमांमुळे आम्ही प्रत्यक्ष सूत्रे हाती घेण्याअगोदर काहीही उघड करू शकत नाही, असे अदानी पॉवरमधील सूत्रांनी स्पष्ट केले. कर्मचारी संपावर जातील व काही महिन्यांनंतर महावितरण दिसणार नाही हे लक्षात आल्यावर अनेक ग्राहक देयक भरणे बंद करतील. यामुळेच कंपनीने याबाबत गुप्तता पाळली असल्याची माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली आहे.

ग्राहकांची थकबाकी ७२ हजार कोटींच्या पुढे

महावितरणला २८ फेब्रुवारीपर्यंत १० हजार ६०० कोटी रुपये भरायचे आहेत आणि ते भरण्याच्या स्थितीत नाहीत. एमएसईडीसीएल आर्थिक संकटात सापडले असून ग्राहकांची थकबाकी ७२ हजार कोटींच्या पुढे गेली. वसुली आणि वीजचोरीविरोधी मोहिमेचा फारसा फायदा झालेला नाही. अदानी समूहाला पैसे द्यावेच लागणार आहेत, पण केंद्र सरकारने बँकांना १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज देऊ नये असे सांगून ही बाब अवघड केली आहे. कंपनीने ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, त्यातील १३ हजार कोटी रुपये अद्याप भरलेले नाहीत. आता मोठ्या शहरांमध्ये व्यवसाय विकून महसूल मिळवणे हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे.

टॅग्स :electricityवीज