शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीने नाही, शिक्षणाने आदिवासींची स्थिती बदलेल

By admin | Updated: October 12, 2015 02:49 IST

आदिवासी समाजात अंधश्रद्धा आहे. आदिवासींची मुले कुपोषणाचे बळी ठरत आहेत.

उमेश चौबे : गोंडी भाषिक आदिवासी संस्थेचा लोकार्पण सोहळा थाटातनागपूर : आदिवासी समाजात अंधश्रद्धा आहे. आदिवासींची मुले कुपोषणाचे बळी ठरत आहेत. तरी सरकार लक्ष देत नाही. यापुढील काळात आदिवासींनी केवळ मतदाता बनून राहू नये. मात्र बंदुका हातात घेतल्यानेही आदिवासींची स्थिती बदलणार नाही. आदिवासींच्या दशेत परिवर्तन करायचे असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे मत ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांनी व्यक्त केले. गोंडी भाषिक संस्थेच्या लोकार्पण सोहळ््यात ते बोलत होते.गोंडी भाषिक आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्थेचा लोकार्पण सोहळा रविवारी थाटात पार पडला. चंद्रमणी सभागृह, नवजीवन कॉलनी, वर्धा रोड येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात समादेशक एन. झेड. कुंभरे, राजमाता राजश्री शाह, डॉ. पिनाक दंदे, वासुदेव टेकाम, संस्थेचे अध्यक्ष महादेव मडावी, उपाध्यक्ष तुकाराम गेडाम, शंकरराव मरसकोल्हे, ज्येष्ठ साहित्यिक मंसाराम कुंभरे आदी मान्यवर उपस्थित होते. उमेश चौबे म्हणाले, गोंडी भाषा या देशाची सर्वात जुनी भाषा आहे. निसर्गाचे गूढ उकलण्यासाठी ही भाषा टिकणे गरजेचे आहे.त्यामुळे आदिवासी बांधवांनी तरी गोंडी भाषा व्यवहारात वापरून जिवंत ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वासुदेव टेकाम म्हणाले, वर्षनुवर्षे रानावनात राहणारा आदिवासी समाज स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही हलाखीचे जीवन जगत आहे. या समाजावर कायम अन्याय करण्यात आला. राज्यघटनेत समाजाला आरक्षण दिले आहे, मात्र शिक्षणाअभावी त्याचा लाभ घेता आला नाही. उलट बोगस आदिवासींनी समाजाच्या अधिकारावर अतिक्रमण केले आहे. अशावेळी खऱ्या आदिवासींना मुख्य प्रवाहात यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून आदिवासी बांधवांनो उपास-तापास सहन करा, मात्र आपल्या मुलांना शिकवा, असे आवाहन त्यांनी केले.डॉ. पिनाक दंदे यांनी आर्थिकदृष्ट्या सबळ झालेल्या समाजातील लोकांनी तळातील बांधवांना मदत करण्याचे आवाहन केले. एन. झेड. कुंभरे यांनी, बोगस आदिवासीमुळे शासकीय नोकऱ्यांमध्ये खऱ्या आदिवासींना फटका बसत असल्याचे सांगत, मुलांनी शिक्षण घेऊन पुढे येण्याची आवश्यकता व्यक्त केली. या कार्यक्रमादरम्यान समाजातील १० वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, समाजकार्यात योगदान देणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सोबतच समाजातील उपवर वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. संचालन विकास तुमडाम यांनी केले. प्रदीप मसराम यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)