शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘नॅरेटिव्ह’च्या लढाई कार्यकर्तेच लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार? फडणवीस यांनी टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2022 20:50 IST

Nagpur News‘नॅरेटिव्ह’च्या लढाई कार्यकर्तेच लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

ठळक मुद्दे ट्वेंटी-ट्वेंटी सरकारकडून काय मिळेल याचा विचार नको

योगेश पांडे नागपूर : राज्यातील सरकारविरोधात काही लोक खोटे ‘नॅरेटिव्ह’ तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात विरोधी पक्षात काहीच दम नाही. त्यामुळे भाजपची लढाई ही विरोधकांशी नसून ‘नॅरेटिव्ह’शी आहे. त्यामुळे विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ मोडून काढत सकारात्मक दृष्टीकोन समाजापर्यंत नेला पाहिजे. मात्र ‘नॅरेटिव्ह’च्या लढाई कार्यकर्तेच लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व जिल्हा संघटन सरचिटणीसांची एक दिवसीय बैठक नागपूर येथे सोमवारी झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवैय्या, ओमप्रकाश धुर्वे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, संजय केणेकर, रणधीर सावरकर, विजय चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यात २०-२० चे सरकार असून अडीच वर्षांसाठीच कार्यकाळ राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता-पदाधिकाऱ्याने २०२४ च्या तयारीवर भर दिला पाहिजे. उर्वरित कालावधीत मला सरकारकडून काय मिळेल याची पदाधिकाऱ्यांनी अपेक्षा करू नये. प्रसंगी त्यागाचीदेखील तयारी ठेवा, असे ते म्हणाले.

अनेक आमदार, जिल्हाध्यक्ष ‘सोशल मिडीया’त ‘फेल’यावेळी फडणवीस यांनी भाजपतर्फे राज्यपातळीवर घेण्यात आलेल्या ‘सोशल मीडिया’ सर्वेक्षणावरून जिल्हाध्यक्षांना परखड बोल सुनावले. केवळ ९ जिल्हाध्यक्षांचे ‘सोशल मीडिया’वरील काम उत्तम आहे. तर ५ जणांचे काम सरासरी पातळीचे आहे. १५ जणांचे तर ‘सोशल मीडिया’वर अस्तित्वच नाही. अनेक आमदारांचीदेखील अशीच स्थिती आहे. प्रत्येकाने ‘सोशल मीडिया’वर व्यक्त झाले पाहिजे व पक्षाची भूमिका सातत्याने मांडली पाहिजे. जे लोक अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत, त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे.

भाजपचे ‘मिशन ५१ टक्के व्होट’भाजपचे राज्यात सरकार असले तरी आत्मसंतुष्ट होण्याची किंवा अतिआत्मविश्वास बाळगू नये. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू करायला हवी. निवडणूकीत ५१ टक्के मते मिळविण्याच्या दृष्टीने संघनट बळकट करण्यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन सी. टी. रवी व बावनकुळे यांनी केले

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस