शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या लेटलतिफ डॉक्टरांवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:57 IST

मेडिकलमध्ये डॉक्टर वेळेवर येत नाहीत. वरिष्ठ डॉक्टर तर बायोमेट्रिक पंचिंग करीत नाही.

ठळक मुद्देनोटीस बजावण्याचे मंत्र्यांचे निर्देश : आमदारांनी मांडले वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमध्ये डॉक्टर वेळेवर येत नाहीत. वरिष्ठ डॉक्टर तर बायोमेट्रिक पंचिंग करीत नाही. रुग्णांना दर्जेदार सेवा मिळत नाही, अशा आमदारांनी केलेल्या तक्रारींची वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी गंभीर दखल घेतली. मेडिकलच्या डॉक्टरांच्या उपस्थितीचा अहवाल तपासण्यात यावा व लेटलतिफ डॉक्टरांना नोटीस बजवा, असे निर्देश महाजन यांनी दिले.मेडिकलमधील समस्यांचा प्रश्न आमदारांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपस्थित केला होता. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी मुंबई येथे नागपूरच्या आमदारांची बैठक घेतली. तीत आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, आ. डॉ. परिणय फुके यांच्यासह वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख, मेडिकलचे अधिष्ठाता अभिमन्यू निसवाडे उपस्थित होते. यावेळी आमदारांनी मेडिकलमधील अव्यवस्था, रुग्णांची होणारी गैरसोय व डॉक्टरांकडून उपचारात होणारा विलंब याचा पाढाच वाचला.आ. अनिल सोले म्हणाले, मेडिकलमधील डॉक्टरांचे एजंटशी लागेबांधे आहेत. येथे रुग्णाला दर्जेदार उपचार दिले जात नाहीत. नंतर एजंटच्या मदतीने रुग्णाला खासगी इस्पितळात हलविले जाते. काही डॉक्टर तेथे नोकरी करतात व सोबतच खासगी इस्पितळ चालवितात. अशा डॉक्टरांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. वर्षभरात ज्या रुग्णांची नोंदणी मेडिकलमध्ये झाली पण शस्त्रक्रिया मात्र खासगी इस्पितळात झाली, याचा अहवाल सादर करण्याचीही मागणी सोले यांनी केली. मेडिकलमधील बहुतांश पदे रिक्त असल्याकडे आ. माने यांनी लक्ष वेधले. रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी त्यांनी केली. आ. परिणय फुके म्हणाले, मेडिकलमध्ये डॉक्टर वेळेवर येत नाहीत.रुग्णांना सेवा मिळत नाही. वरिष्ठ डॉक्टर तर बायोमेट्रिकवर दररोजचे पंचिंग करीत नाहीत. येथे कार्यरत सर्व डॉक्टर व कर्मचाºयांचे तीन महिन्याचे बायोमेट्रिक पंचिंग तपासण्यात यावे, तसेच येथील उपकरणांचे ‘वर्क आॅडिट’ करावे, अशी मागणी त्यांनी केली. गिरीश महाजन यांनी या सर्व तक्रारींची दखल घेत १५ दिवसात सर्व मुद्यांवर अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिष्ठाता अभिमन्यू निसवाडे यांना दिले.११ आॅगस्टनंतर नागपुरात बैठकमंत्र्यांच्या उपस्थितीत आमदारांनी मेडिकलबाबत मांडलेल्या प्रश्नांवर वैद्यकीय शिक्षण सचिव ११ आॅगस्ट नंतर नागपुरात बैठक घेतील, असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत दिले. तर, आपण व्यक्तिगतरीत्या लक्ष देऊन दोन महिन्यात मेडिकलमधील परिस्थिती सुधारू, अशी हमी सचिव संजय देशमुख यांनी दिली.