शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

चेन पुलिंग करणाऱ्या १०९० जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:11 IST

दयानंद पाईकराव नागपूर : संकटकाळात रेल्वेगाडी थांबविण्यासाठी रेल्वेगाडीच्या प्रत्येक कोचमध्ये चेन लावलेली असते. आपातकालीन स्थितीत ही चेन ओढून रेल्वेगाडी ...

दयानंद पाईकराव

नागपूर : संकटकाळात रेल्वेगाडी थांबविण्यासाठी रेल्वेगाडीच्या प्रत्येक कोचमध्ये चेन लावलेली असते. आपातकालीन स्थितीत ही चेन ओढून रेल्वेगाडी थांबविता येते; परंतु अनेक प्रवासी विनाकारण क्षुल्लक कारणासाठी ही चेन ओढतात. गेल्या तीन वर्षात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने विनाकारण चेन पुलिंग करणाऱ्या १०९० प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ६ लाख ७६ हजार ८२५ रुपये दंड वसूल केला आहे. तर दंड न भरणाऱ्या ८ जणांना तुरुंगात जाण्याची वेळ आली.

अनेकदा रेल्वेने जाणारे प्रवासी ऐनवेळी रेल्वेस्थानकावर पोहोचतात. घाईगडबडीत काही जण रेल्वेत बसतात तर काही जण प्लॅटफॉर्मवरच राहतात. मग आत चढलेले नातेवाईक चेन ओढून रेल्वेगाडी थांबवितात. अशा वेळी रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने रेल्वे ॲक्ट १४१ नुसार कारवाई करण्यात येते. विनाकारण रेल्वेची चेन ओढणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. ठोस कारण असल्याशिवाय रेल्वेची चेन ओढणे चुकीचे आहे; परंतु प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, त्यांना आरपीएफच्या कारवाईला सामोरे जावे लागते. रेल्वे ॲक्ट १४१ नुसार विनाकारण चेन पुलींग करणाऱ्या प्रवाशांना ५०० रुपये दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा आहे. त्यामुळे क्षुल्लक कारणासाठी चेन पुलींग करीत असाल तर ही शिक्षा भोगण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते.

...............

तीन वर्षातील कारवाई

वर्ष/ कारवाई / दंड

२०१९/ ५७२ / ३८८१९५

२०२०/ २२० / १२९३३०

२०२१ (ऑगस्टपर्यंत) २९७ / १५९३००

ही आहेत चेन पुलींगची कारणे

-ऐनवेळी रेल्वेस्थानकावर पोहोचून नातेवाइकांसाठी चेन ओढणे

-खाद्यपदार्थ घेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर गेलेले नातेवाईक न आल्यामुळे चेन ओढणे

-नव्या डिझाईनच्या कोचमध्ये चेनच्या हँडलला पकडून बर्थवर चढणे

-मोबाइल खाली पडला म्हणून चेन ओढणे

चेन पुलींगमुळे रेल्वेचे नुकसान

‘चेन पुलींग केल्यामुळे रेल्वेचे नुकसान होते. मागून येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडते. रेल्वेगाडी थांबल्यानंतर पुन्हा सुरू करण्यासाठी अधिक वीज खर्च होते. चेन पुलींग करणे रेल्वे ॲक्टनुसार गुन्हा आहे. त्यामुळे ठोस कारण असल्याशिवाय चेन पुलींग करणे टाळावे. विनाकारण चेन पुलींग केल्यास दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो.’

-आशुतोष पांडे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल, नागपूर.

.............