शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छता पसरविणाऱ्या १०२ लोकांवर कारवाई; ५४१०० रुपयाचा दंड वसूल

By मंगेश व्यवहारे | Updated: March 5, 2024 15:10 IST

रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा आदी ठिकाणी कचरा टाकल्या प्रकरणी ७ लोकांवर कारवाई करण्यात आली.  १० दुकानदारावर रस्ता, फुटपाथ, मोकळी येथे कचरा टाकल्याने कारवाई करण्यात आली.

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्या अशा  १०२ लोकांवर कारवाई करून ५४१०० रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता केल्याने २४ लोकांवर कारवाई करून ९६०० रुपये दंड वसूल केला.

रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा आदी ठिकाणी कचरा टाकल्या प्रकरणी ७ लोकांवर कारवाई करण्यात आली.  १० दुकानदारावर रस्ता, फुटपाथ, मोकळी येथे कचरा टाकल्याने कारवाई करण्यात आली. एका शैक्षणिक संस्थेवरही रस्त्यावर कचरा टाकल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. दोन हॉटेलवाल्यांवर दंडात्मक कारवाई करून ४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.   वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज अडवून ठेवल्या प्रकरणी ११ लोकांवर कारवाई करून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. 

प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या ६ जणांवर कारवाई

प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ६ लोकांवर कारवाई करून १५ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.  याशिवाय रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविणे या अंतर्गत लक्ष्मीनगर झोन येथील श्री कमलेश अपार्टमेंट, नेहरूनगर झोन येथील मे. गिरीधर कंन्स्ट्रक्शन्स, मंगळवारी झोन येथील मे. भाव्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांच्यावर कारवाई करीत प्रत्येकी १० हजार रुपये दंड वसूल केला.