शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई व्हावी

By admin | Updated: September 19, 2016 03:01 IST

वंचित समाजातील कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा अस्तित्वात आला

नागराज मंजुळे यांचे प्रतिपादन : नागपूर विद्यापीठातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कारनागपूर : वंचित समाजातील कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा अस्तित्वात आला. परंतु जर ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गैरवापर होत असेल तर ते अयोग्य आहे. असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. या कायद्याचा गैरवापर का होतो आहे हेदेखील शोधले गेले पाहिजे, असे मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा रविवारी सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमस्थळी मंजुळे यांनी हे वक्तव्य केले.विद्यापीठाच्या गुरुनानक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे होते. याशिवाय प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, कुलसचिव पूरण मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.भाऊ दायदार, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.निहाल शेख, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक रवींद्र पुंडलिक हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा रद्द व्हावा अशी मागणी होत आहे.या कायद्याचा गैरवापर का होत आहे, याबाबत नीट चौकशी व्हावी. ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा रद्द झाला तर परिस्थितीत खरेच किती फरक पडेल याबाबतदेखील सखोल अभ्यास व्हावा, असे नागराज मंजुळे म्हणाले. जीवनात आपल्याला अनेक जण मार्गदर्शन करतात. परंतु अनेक विचारवंत ऐकले की संभ्रम वाढतो. त्यामुळे जगण्यातूनच आपण शिकले पाहिजे. ‘एनएसएस’ हे जगण्यातून शिकविणारे माध्यम आहे. यातून माणूस तर घडतोच. शिवाय हरणे पचवायलादेखील शिकवितो. अनेकदा विद्यापीठातून शिकविलेले शिक्षण कुचकामी ठरते. शिक्षणामुळे एक रुबाब येतो व काही वेळा हाच रुबाब प्रगतीच्या आडदेखील येतो. मला असाच अनुभव आला आहे, असेदेखील मंजुळे यांनी यावेळी सांगितले.एक काळ होता ज्यावेळी चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन होते. जे दिसायचे ते खोटे आहे, हे सर्वांना माहीत असायचे. परंतु आता स्थिती बदलते आहे. वास्तववादी चित्रपटांमुळे जनप्रबोधन होत आहे, असे प्रतिपादन डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केले. डॉ.प्रमोद येवले यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले, तर पूरण मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. नागराज मंजुळे यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर डॉ.भाऊ दायदार यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)