शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेती तस्करांना चाप : तीन ट्रक पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 20:52 IST

अनेक दिवसांपासून बिनबोभाट रेती तस्करी करणाऱ्या रेती माफियांची तीन वाहने पोलिसांनी आज पकडली. पकडलेली रेती आणि ट्रकची किंमत ५० ते ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे रेती माफियांना चाप बसला आहे.

ठळक मुद्देरेतीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक दिवसांपासून बिनबोभाट रेती तस्करी करणाऱ्या रेती माफियांची तीन वाहने पोलिसांनी आज पकडली. पकडलेली रेती आणि ट्रकची किंमत ५० ते ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे रेती माफियांना चाप बसला आहे. महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस विभागातील काही भ्रष्टाचारी यांच्याशी संगनमत करून रेती माफिया नियमित कोट्यवधीची रेती तस्करी करतात. गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात हा गोरखधंदा सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी प्रचंड प्रमाणात रेतीचे साठे जप्त करून वाळू माफियांना दणका दिला होता. त्यामुळे काही दिवस रेती तस्कर शांत बसले. नंतर मात्र पुन्हा जैसे थे सुरू झाले. लॉकडाऊन असूनही रेती माफियांची वाहने बिनबोभाट रेतीचे ट्रक घेऊन जात असल्याचे रात्री-बेरात्री दिसते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रेती माफिया अधिकच निर्ढावले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू केली आहे. ही माहिती कळताच वाहतूक शाखेचे उपायुक्त विक्रम साळी यांनी आज भल्या सकाळी दिघोरी नाक्यावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने वाहनांना पकडण्याची मोहीम सुरू केली. कारवाईत रेतीने भरलेले तीन टिप्पर पोलिसांच्या हाती लागले. प्रत्येक टिप्परमध्ये पाच ब्रास अशी एकूण १५ ब्रास रेती आहे. तिची किंमत सव्वा ते दीड लाख रुपये असून टिप्परची किंमत धरून एकूण मुद्देमाल ५० लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई झाल्याचे कळताच मागून येणारी सर्व रेतीने भरलेली वाहने माफियांनी दुसऱ्या मार्गाने शहराबाहेर नेली.३० वाहनांवर कारवाईजड वाहनांना शहरात वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. तरीसुद्धा अनेक जड वाहने बिनधास्त शहरात फिरतात. अशा ३० वाहनांना वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी