शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांची अडवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई : आरोग्यमंत्री राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 21:28 IST

खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल करण्यापूर्वी अनामत रक्कम जमा करून अडवणूक करण्याच्या तक्रारी येत असून अशी अडवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे कडक निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल करण्यापूर्वी अनामत रक्कम जमा करून अडवणूक करण्याच्या तक्रारी येत असून अशी अडवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे कडक निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.आयुक्तालयात आयोजित बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, महापौर संदीप जोशी, खासदार कृपाल तुमाने, आ. विकास कुंभारे, आ. समीर मेघे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सुधाकर शिंदे, अर्चना पाटील, आयएमएचे अध्यक्ष संजय देवतळे, अर्चना कोठारी यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.खासगी रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांकडून पैसे जमा केल्याशिवाय उपचार केल्या जात नसल्याच्या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या हॉस्पिटलविरुद्ध कारवाई करण्यासाठी आयएमएने सहकार्य करावे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.महत्त्वाचे मुद्देहोम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना टेलिमेडिसीन उपचार पद्धती तात्काळ सुरू करावी.औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करावी.प्लाझ्मा थेरेपीचे काम मेडिकलमध्ये चांगल्या पद्धतीने सुरू.वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सेवा पुणे-मुंबई येथे न घेता नागपुरातच उपलब्ध करून देण्यात येतील.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRajesh Topeराजेश टोपे