शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

वाळू माफियांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा अ‍ॅक्शन प्लॅन

By admin | Updated: November 26, 2014 01:08 IST

रेतीचे अवैध उत्खनन करून सरकारला कोट्यवधींचा फटका देणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी अ‍ॅक्शन प्लॅन बनविला आहे.

नागपूर : रेतीचे अवैध उत्खनन करून सरकारला कोट्यवधींचा फटका देणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी अ‍ॅक्शन प्लॅन बनविला आहे. दुसरीकडे शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याने वाळू माफियांना आज सावधानतेचा इशारा देत सतर्कतेने काम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. रेतीघाट बंद असूनदेखील नागपूर शहरात रोज ३०० ते ४०० ट्रक रेती येते. वैनगंगेच्या पात्रातून ही रेती चोरून आणली जाते. सर्वाधिक रेती रोहा, बेताळा, कोतुर्णा, टाकळी, खमाटी या घाटावरून काढली जाते. यापैकी काही ठिकाणी वाळू माफियांनी चक्क मशीनच लावल्याची सूत्रांची माहिती आहे.वाळू माफिया ट्रकचालकांना दारू पाजून प्रमाणापेक्षा जास्त (ओव्हरलोड) रेती भरून भंडारा, रामटेक, उमरेड(पवनी)मार्गे ही रेती नागपुरात आणतात. पोलीस, परिवहन विभाग (आरटीओ) आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांना त्याची माहिती असते. मात्र, यातून त्यांना त्यांचा हिस्सा रोजच हातात पडत असल्यामुळे या तस्करीकडे भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. आज लोकमतने ठळकपणे रेती तस्करीचे वृत्त प्रकाशित करताच वाळू माफिया आणि भ्रष्ट यंत्रणेचे धाबे दणाणले. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील वाळू माफियांनी ठिय्ये रिकामे करण्यासाठी धडपड चालवली. पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने आपल्या हस्तकामार्फत वाळू माफियांना निरोप पाठवून सतर्कतेने काम करण्याचा सल्ला दिल्याचे समजते. दुसरीकडे वाळू माफियांच्या विरोधात आपण अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला असून, लवकरच त्याचे परिणाम बघायला मिळतील,अशी माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी आज लोकमतला दिली. कारवाईची योजना कशी असेल, हे सांगणे योग्य होणार नाही. मात्र, सांगण्यापेक्षा कृतीच करून दाखवू, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी)असोसिएशनचा आरोपवाळू माफियांना पोलीस, आरटीओ आणि महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची साथ असल्यामुळेच रोज लाखोंच्या रेतीची तस्करी केली जात असल्याचा आरोप युनायटेड लोकल ट्रक असोसिएशनने केला. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच आज असोसिएशनचे अध्यक्ष शंकर गुप्ता तसेच साजीदखान समशेर खान, अतिक आलम, अशोक रामलखन पवन, प्रवीण दुल्हेवाले, भागवत मेश्राम, आसिफ खान बबलू कुरेशी यांनी एक प्रसिद्धी पत्रक दिले. पोलीस, महसूल आणि आरटीओंकडे वारंवार लेखी तक्रारी करून, पुरावे देऊनही वाळू माफियांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप उपरोक्त पदाधिकाऱ्यांनी या प्रसिद्धी पत्रकातून केला.