शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कस्तूरचंद पार्कमध्ये हाणामारी

By admin | Updated: September 25, 2016 03:12 IST

कस्तूरचंद पार्कवर लागलेल्या प्रदर्शनात पार्किंच्या मुद्यावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली.

पार्किंगमुळे वाद : वाहनचालकांकडून अवैध वसुली,तिघे जबर जखमीनागपूर : कस्तूरचंद पार्कवर लागलेल्या प्रदर्शनात पार्किंच्या मुद्यावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर पार्किंगच्या नावाखाली अवैध वसुली करणाऱ्या एका गटातील आरोपींनी जोरदार हल्ला चढवल्याने प्रदर्शनाच्या आयोजकांसह तिघे जबर जखमी झाले. शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास झालेल्या या हाणामारीमुळे कस्तूरचंद पार्क परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कस्तूरचंद पार्कमध्ये अशपाक अली नामक कंत्राटदाराने एम्युजमेंट पार्क प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. येथे येणाऱ्यांच्या वाहनचालकांना पार्किंगची नि:शुल्क व्यवस्था आयोजकांनी केली आहे. मात्र, प्यारू नामक व्यक्तीने आपल्या साथीदारांसह येथे अवैध पार्किंग सुरू करून वाहनचालकांकडून वसुली करणे सुरू केले. त्यामुळे प्रदर्शनाच्या आयोजकांमध्ये तसेच पार्किंगची अवैध वसुली करणारे यांच्यात शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास वाद सुरू झाला. आयोजकांनी मोफत पार्किंग करण्याबाबत वाहनचालकांना सूचना देऊन बोलवणे सुरू केल्याने प्यारू आणि त्याच्या साथीदारांनी अशपाक अली (वय ४५) यांच्याशी बाचाबाची सुरू केली. त्याचे रुपांतर हाणामारी झाले. प्यारू आणि त्याच्या साथीदारांनी अशपाक अली तसेच त्यांचे कर्मचारी चमनभाई (वय ५५) आणि अशफाक भाई (वय २५) यांच्यावर दंडुक्याने जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे अशपाक अली यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. तर, चमनभार्इंच्या डोक्यावर जबर दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. माहिती कळताच सदर पोलिसांचा ताफा कस्तूरचंद पार्कमध्ये पोहचला. त्यांनी दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. दोन्हीकडून समेट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही पोलीस सांगत होते. (प्रतिनिधी)