शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्च सादर न केल्यास कारवाई

By admin | Updated: April 11, 2017 02:17 IST

राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकीच्या खर्चाचा अहवाल दोन महिन्यात निवडणूक विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे.

निवडणूक आयुक्तांचा इशारा : राजकीय पक्षांना २३ एप्रिलपर्यंत मुदत

नागपूर : राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकीच्या खर्चाचा अहवाल दोन महिन्यात निवडणूक विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. २२ एप्रिलला ही मुदत संपत आहे. या मुदतीत खर्चाचा अहवाल सादर न केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य निवडणूक आयुक्त जगेश्वर सहारिया यांनी सोमवारी दिला. महापालिका मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत निवडणुकीत आलेल्या अडचणींचा सहारिया यांनी आढावा घेतला. आयुक्त श्रावण हर्डीकर, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, रंजना लाडे, सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. निवडणुकीत विभागातील अधिकाऱ्यांना आलेल्या अडचणींची माहिती जाणून घेतली. भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही. यादृष्टीने निवडणूक प्रक्रियेत अपेक्षित सुधारणांची पुस्तिका तयार करा. शिवाय महाविद्यालय स्तरावर मतदान कार्ड बनविण्यासाठी महाविद्यालयांचा सहभाग आदी विषयांवर यावेळी आढावा घेण्यात आला. या संदर्भात योग्य नियोजन करून काय करता येईल, केव्हा करता येईल आणि कसे करता येईल या तिन्ही बाबींचा सखोल अभ्यास करा. याचा अहवाल तयारकरून त्याची अंमलबजावणी करा, असे निर्देश सहारिया यांनी दिलेत.मतदानासंदर्भात जनजागृती करण्यात आली. अनेक मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचले. परंतु त्यांची नावे यादीत नव्हती. दुसरीकडे अनेक वर्षांपूर्वी नागपुरातून स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे यादीत आहेत. ती गळण्याची गरज आहे, असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले.महापालिका निवडणुकीत मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियासह अन्य प्रभावी माध्यमांचा वापर करण्यात आला. ही बाब कौतुकास्पद आहे. प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यप्रक्रिया तयार करण्याची सूचना सहारिया यांनी केली. (प्रतिनिधी)वास्तव्यास नसलेल्यांची यादीत नावेमतदानासंदर्भात जनजागृती करण्यात आली. अनेक मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचले. परंतु त्यांची नावे यादीत नव्हती. दुसरीकडे अनेक वर्षांपूर्वी नागपुरातून स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे यादीत आहेत. ती गळण्याची गरज आहे. असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले.मर्यादेपेक्षा अधिक खर्चमहापालिका निवडणुकीत उमेदवारांना खर्चाची मर्यादा १० लाखापर्यंत होती. परंतु अनेक उमेदवारांनी याहून अधिक खर्च केला आहे. अशा उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.