शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ई-रिक्षांवर कारवाई

By admin | Updated: August 8, 2014 01:07 IST

शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई- रिक्षांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे,

नागपूर- शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई- रिक्षांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, विदर्भ आॅटोरिक्षाचालक फेडरेशननेही नियमबाह्य धावत असलेल्या या ई-रिक्षांवर कारवाईची मागणी केली आहे. प्रथमदर्शनी या ई-रिक्षा वाहतूक आणि नागरिकांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्यांना तातडीने थांबविण्यात यावे, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. आरटीओ तज्ज्ञाच्या मते, ई-रिक्षा या बेकायदेशीर आहे. जोपर्यंत त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदा तयार होत नाही, तोपर्यंत या रिक्षांना थांबविणेच योग्य आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार रिक्षाचालकांना नाही. या रिक्षाचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, किंवा कारवाई कशी करणार, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. आॅटोरिक्षा चालक संघटनेनेही या ई-रिक्षाला विरोध दर्शवून नियमबाह्य धावणाऱ्या या रिक्षांवर कारवाई करण्याचे निवेदन आरटीओला दिले आहे. आरटीओने आतापर्यंत तीन ई-रिक्षा जप्त केल्या असून ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)