शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बेकरी व इलेक्ट्रिक व्यापाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: November 29, 2014 03:00 IST

महापालिकेच्या एलबीटी (स्थानिक संस्था कर) विभागाने शुक्रवारी न्यू फाईव्ह स्टार बेकरी व ए.व्ही. सोल्युशन या दोन प्रतिष्ठानांवर धाड घालून कागदपत्रांची तपासणी केली.

नागपूर : महापालिकेच्या एलबीटी (स्थानिक संस्था कर) विभागाने शुक्रवारी न्यू फाईव्ह स्टार बेकरी व ए.व्ही. सोल्युशन या दोन प्रतिष्ठानांवर धाड घालून कागदपत्रांची तपासणी केली. तपासणीत एलबीटी न भरल्याचे उघडकीस आल्याने संबंधितांचे खाते सील करण्यात आले. टेकानाका, कामठी रोड येथील न्यू फाईव्ह स्टार बेकरीचे डिलर अक्रम हुसैन यांनी २०१३-१४ मध्ये चुकीचे रिटर्न फाईल करीत १५.३८ कोटी रुपयांचा माल नागपुरातील स्थानिक डिलरकडून खरेदी केल्याचे दाखविले. त्यामुळे आपल्यावर कुठलाही एलबीटी थकीत नसल्याचेही त्यांनी कागदोपत्री दाखविले. मात्र, एलबीटी विभागाने कागदपत्रांची तपासणी केली असता त्यांनी २०१३-१४ मध्ये ९० लाख ४३ हजार रुपयांचा व २०१४-१५ मध्ये ४९ लाख ४१ हजार रुपयांचा माल शहराबाहेरून आयात केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी एकूण १ कोटी ४० लाख रुपयांवरील एलबीटी भरला नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांनी आजवर एलबीटी भरलेला नाही. त्यामुळे न्यू फाईव्ह स्टार बेकरीचे खाते सील करण्यात आले. आता विभागातर्फे नियमानुसार दंडासह एलबीटी आकरण्यात येईल.धंतोली गार्डनजवळील ए.व्ही. सोल्युशन हे इलेक्ट्रिकल वस्तूंचा व्यवसाय करते.मात्र, त्यांनी २०१३-१४ मध्ये सुमारे १ कोटी ३४ लाख रुपयांचा माल खरेदी केला. पण एलबीटी रिटर्न फाईल केला नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचेही खाते सील करण्यात आले. आता विभागातर्फे नियमानुसार दंडासह एलबीटी आकारला जाईल. एलबीटी अधिकारी व्ही.एस. जिचकार, सहायक अधिकारी रमेश गिरी, सुमेर गजभिये, विकास चहांदे, संजय मेंडुले, रमेश पडघन, सुरेश धुपे, दत्तराज वानखेडे आदींनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)