सहायक आयुक्तांची जबाबदारी : आजवर कुणालाही जबाबदार धरले नाहीनागपूर : मागील काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविली जात आहे. ही कारवाई योग्यच आहे परंतु अतिक्र मणावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कुणाची आहे. त्यांना यासाठी जबाबदार का धरले जात नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी वेळीच कारवाई के ली असती तर आज महापालिका प्रशासनावर ही वेळी आलीच नसती. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात शहरातील अक्रिमणाला आळा घालण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले होते. शहरात अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपविण्यात आली होती. अतिक्रमण झाल्यास त्यांना जबाबदार धरले जात होते. अतिक्रमण कारवाईचे अधिकार सहायक आयुक्तांना देण्यात आले. गरज भासल्यास त्यांना पोलीस संरक्षणाची मागणी करता येते.जयस्वाल यांच्यानंतर श्याम वर्धने यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन उपायुक्त व विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांनी धडक मोहीम राबविली होती. परंतु त्यांची बदली महसूल विभागात झाल्यापासून अतिक्रमण विरोधातील कार्यवाही जवळजवळ ठप्पच झाली आहे. मनपाकडे अतिक्रमणविरोधी पथक आहे. परंतु आवश्यक यंत्रसामग्री नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा मोहीम राबविली जाते. झोन कार्यालयाकडून अतिक्रमण करून बांधकाम झाल्यास कारवाई केली जाते. (प्रतिनिधी)कठोर नियमाची गरज अतिक्रमणामुळे शहराचा चेहराचा विद्रुप होत आहे. अतिक्रमण करून कायमस्वरूपी बांधकाम केल्यास कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांना कारवाई करणे सोयीचे व्हावे, यासाठी कठोर नियमाची गरज असल्याचे मत स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी व्यक्त केले.
कारवाई योग्यच पण अतिक्रमणाला जबाबदार कोण?
By admin | Updated: May 23, 2015 02:52 IST