शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; मतदानासाठी सुटी न देणाऱ्याविरुद्ध होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 11:19 IST

विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपल्या कामगारांना सुटी अथवा सवलत न देणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर जिल्हाधिकारी अथवा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपल्या कामगारांना सुटी अथवा सवलत न देणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अथवा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिला आहे. विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या २१ ऑक्टोबर रोजी होत असून त्याअनुषंगाने मतदार संघात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे, केंद्र शासनाची सर्व कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच बँकांनाही सार्वजनिक सुटी देण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी ऐवजी दोन ते तीन तासाची सुटी देणे बंधनकारक आहे. ज्या कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क दोन ते तीन तासात बजावता येणार नाही अशा कामगारांना भरपगारी सुटी देण्यात यावी. मतदानाच्या हक्काबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील. अशा आस्थापनांविरुद्ध भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019