शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

औषध दुकानांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:08 IST

गाई-म्हशींचे दूध वाढविण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘आॅक्सिटोसिन’ औषधाची विक्री करणाऱ्या औषध दुकानांच्याविरोधात रविवारपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोहीम उघडली आहे. नागपुरात ही मोहीम सोमवारी सुरू झाली. औषध दुकानांच्या तपासणीची कामे सुरू झाली असून ‘आॅक्सिटोसिन’ची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. यात दहावर औषध दुकाने दोषी आढळून आल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदूधवाढीच्या औषधांची विक्री : एफडीएची तपासणी मोहीम सुरू

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गाई-म्हशींचे दूध वाढविण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘आॅक्सिटोसिन’ औषधाची विक्री करणाऱ्या औषध दुकानांच्याविरोधात रविवारपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोहीम उघडली आहे. नागपुरात ही मोहीम सोमवारी सुरू झाली. औषध दुकानांच्या तपासणीची कामे सुरू झाली असून ‘आॅक्सिटोसिन’ची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. यात दहावर औषध दुकाने दोषी आढळून आल्याची माहिती आहे.स्तनपानासाठीही ‘आॅक्सिटोसिन’ औषध महत्त्वाचे मानले जाते. प्रसूतीच्या काळात अतिरिक्त रक्तस्रावाला प्रतिबंध करण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो. मात्र, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनने आणि त्याचा प्रमाणित डोस घेणे आवश्यक असते. औषधाच्या अवैध आणि अतिरिक्त वापराने कर्करोगाची भीती असते. आॅक्सिटोसिनचा गैरवापर होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. शरीरविक्रीच्या रॅकेटमधील दलाल, भाजी व फळांची वेगाने वाढ व्हावी यासाठीही आॅक्सिटोसिनचा वापर वाढत असल्याच्या तक्रारी एफडीएकडे आल्या होत्या. याची दखल घेत मुंबईमध्ये ‘एफडीए’ने तोतया ग्राहक पाठवून प्रिस्क्रिप्शनशिवाय आॅक्सिटोसिनची अवैध विक्री पकडली. दुकानांचे बिलबुकही तपासण्यात आले. हीच मोहीम नागपुरातही सुरू झाली. परंतु रात्री उशिरापर्यंत किती औषध दुकानांवर कारवाई झाली, ही माहिती अधिकाऱ्यांकडे नव्हती. मात्र सूत्रानुसार दहाच्यावर दुकानांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :medicinesऔषधंFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग