लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ४५ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून २२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्कसुद्धा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३७,१८९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ६९ लाख ५३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. रेल्वेस्थानकावरही ही कारवाई केली जात आहे.
मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत १६, धरमपेठ ४, धंतोली २, नेहरूनगर २, गांधीबाग ५, आशीनगर ५, मंगळवारी ११ जणांविरुद्ध ही कारवाई केली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई सुरू आहे.