शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बनावट आधारकार्डवर प्रवास करणाऱ्या १०५ प्रवाशांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:20 IST

दिवाळीत दलालांनी रेल्वेगाड्यांची सर्व तिकिटे बुक केली. गरजू प्रवाशांकडून अधिक पैसे घेऊन त्यांना बनावट आधारकार्ड पुरविले. परंतु याची माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने गरिबरथ आणि नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये कारवाई केली.

ठळक मुद्देआशुतोष पांडेय् यांची माहिती : दलालांनी पुरविले आधारकार्ड, १.१७ लाख दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीत दलालांनी रेल्वेगाड्यांची सर्व तिकिटे बुक केली. गरजू प्रवाशांकडून अधिक पैसे घेऊन त्यांना बनावट आधारकार्ड पुरविले. परंतु याची माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने गरिबरथ आणि नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये कारवाई केली. कारवाईत १०५ प्रवासी बनावट आधारकार्डवर प्रवास करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून १ लाख १७ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय् यांनी पत्रकार परिषदेत दिली.दिवाळीच्या काळात सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल राहतात. चार महिन्यांपूर्वी रेल्वेगाडीचे आरक्षण सुरू होते. याचा फायदा घेऊन रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या नागपुरातील १० दलालांनी प्रवाशांकडून अधिक पैसे वसूल करून त्यांना तिकीट पुरविले. यात १२११४ नागपूर-पुणे गरिबरथ एक्स्प्रेसमधील ४४ प्रवाशांना तसेच १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमधील ६१ प्रवाशांना बनावट आधारकार्ड देऊन तिकीट पुरविण्यात आले. दलालांनी तिकीट पुरविल्याची गुप्त माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय् यांनी मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या सहकार्याने दोन पथक तैनात केले. यातील एका पथकाने गरिबरथ एक्स्प्रेसमध्ये ४४ प्रवाशांकडे बनावट आधारकार्ड आढळल्यामुळे त्यांच्याकडून ५० हजार ६०० रुपये तसेच १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमधील ६१ प्रवाशांकडे बनावट आधारकार्ड आढळल्यामुळे त्यांच्याकडून ६६ हजार ५०० रुपये असा एकूण १ लाख १७ हजार १०० रुपये दंड वसूल केला. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या १० दलालांविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची चौकशी सुरू आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान २७५१ तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणून २३ लाख ७० हजार ४० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय् यांनी दिली. ही कारवाई निरीक्षक गणेश गरकल, उपनिरीक्षक मो. मुगिसुद्दीन, निरीक्षक एस. बी. पगारे, उपनिरीक्षक उषा बिसेन, के. ए. अन्सारी, प्रकाश रायसेडाम, सतीश इंगळे, जी. आर. कोटले, चुन्नीलाल, ईशांत दीक्षित, सुभाष आदवारे, पूनम सांगवाल, संगीता साहू, अमीचंद सैनी, आर. के. गुप्ता, एस. एस. बघेल यांनी पार पाडली.दलालांना पोलिसांच्या ताब्यात देणारबनावट आधारकार्ड तयार करून ते प्रवाशांना पुरविणे हा गुन्हा आहे. रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई केली असून, चौकशीनंतर बनावट रेल्वे तिकीट तयार करून ते प्रवाशांना पुरविल्याबद्दल तिकीट दलालांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय् यांनी दिली.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डrailwayरेल्वेpassengerप्रवासीArrestअटक