शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेमार्ग ब्रॉडगेज व्हावा

By admin | Updated: December 11, 2015 03:38 IST

राज्य सरकारने अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेमार्गाला ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकार पाठवणार केंद्राला प्रस्ताव: चंद्रकांत पाटील यांची माहितीनागपूर : राज्य सरकारने अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेमार्गाला ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती देत राज्य मंत्रिमंडळाने या संदर्भातील निर्णय घेतला असल्याचे सांगितले. या संदर्भात राज्यातील मंत्री केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटणार आहेत. आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केलेल्या अशासकीय प्रस्तावावर पाटील बोलत होते. बच्चू कडू यांनी आपल्या प्रस्तावात या रेल्वेमार्गाच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकून रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करून तो बैतूलला जोडण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, यामुळे दिल्लीचे अंतर १५० किलोमीटरने कमी होईल. मेळघाटसारख्या विदर्भातील मागासलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही कृषी उत्पादनासाठी बाजार उपलब्ध होईल. या मार्गावरून चालणारी रेल्वेगाडी शकुंतलेच्या दयनीय अवस्था विशद केली. इंग्रज देश सोडून गेल्यावरही त्यांनी २००६ पर्यंत या रेल्वेगाडीचे संचालन केले. मागील १० वर्षांपासून हा रेल्वेमार्ग ही गाडी भारतीय रेल्वेच्या ताब्यात आहे. परंतु आजपर्यंत त्याच्या विकासासाठी किंवा देखरेखीसाठी काहीच करण्यात आलेले नाही. या मार्गावरील सर्वच रेल्वेस्टेशन मोडकळीस आले आहे. कधीही कोसळू शकतात. त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानीही होऊ शकते, असेही आ. बच्चू कडू यांनी सांगितले. या प्रस्तावाला उत्तर देताना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, रेल्वेमार्ग आणि स्टेशन हे केंद्र सरकारच्या अखत्यारित असतात. राज्य सरकार त्यावर खर्च करू शकत नाही. त्यामुळे या स्टेशनला विकसित करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे. केंद्राला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात या रेल्वेमार्गाला विकसित करण्यासाठी सर्वे सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. मागणीसाठी ते आ. बच्चू कडू यांच्यासोबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करायला दिल्लीला जातील. या रेल्वेमार्गाचे काम प्राधान्याने व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)